सोन्यासाठी काहीही…! केसांच्या क्लिपला सोन्याच्या पट्ट्या, अंतर्वस्त्रातूनही सोन्याची तस्करी, कोट्यवधींचा माल जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या काही महिन्यात सोन्याची बरीच तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. अशीच एक आणखी घटना उघडकीस आली असून कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 4.69 कोटी रुपये किमतीचं 8 किलो सोनं जप्त केलं

सोन्यासाठी काहीही...! केसांच्या क्लिपला सोन्याच्या पट्ट्या, अंतर्वस्त्रातूनही सोन्याची तस्करी, कोट्यवधींचा माल जप्त
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 11:56 AM

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या काही महिन्यात सोन्याची बरीच तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. अशीच एक आणखी घटना उघडकीस आली असून कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 4.69 कोटी रुपये किमतीचं 8 किलो सोनं जप्त केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई करत 11 प्रवाशांना अटक केली. त्यामध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी अंतर्वस्त्रात तसेच गुदद्वारात लपवून सोन्याची तस्करी केली होती. तसेच केसांच्या क्लिप्सनाही सोन्याच्या पट्ट्या चिटकवण्यात आल्याचं तपासात उघड झालं.

तब्बल 8 किलो सोनं जप्त

पोलिसांनी तपासणी केल्यावर या व्यक्तींकडून तब्बल 4.69 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं आहे. कस्टम्स विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सोन्याचं मेण, रोडियम प्लेटेड वायर आणि बक्कल तसेच वॉशरच्या आकाराच्या रिंग यांच्या स्वरूपात सोन्याची तस्करी या रॅकेटकडून सुरू होती अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे प्रमाण गेल्या काळी काळात वाढले आहे. सोमवारी देखील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 3.52 कोटी रुपयांच सोनं जप्त करण्यात आलं होतं. तर यापूर्वी नागपूर विमानतळावरही काही लोकांनी सोन्याची तस्करी करण्यासाठी अफलातून शक्कल लढवली होती.

काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका इसमाने चक्क कॉफी मेकर मशीनमध्ये सोन लपवलं होतं.  त्याच्याकडून तब्बल दोन कोटी रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं होतं.

बाळाच्या डायपरमधूनही केली सोन्याची तस्करी

तर काही दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळावरही सोन्याची तस्करी करण्यात येत होती. पण कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो डाव उधळला गेला. आरोपींनी कोट्यवधी रुपयांच्या सोन्याच्या पावडरीच्या तस्करीसाठी चक्क डायपरचा वापर केला. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी १२ सप्टेंबर रोजी सिंगापूरहून परत येणाऱ्या भारतीय कुटुंबाला अडवले. आणि त्यांच्याकडून सोन्याची पावडर जप्त केली. त्या प्रवाशांनी त्यांच्या अंतर्वस्त्रात आणि तीन वर्षांच्या लहान मुलाच्या डायपरमध्ये सोन्याची पावडर लपवून आणण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांचा डाव उधळत अटक करण्यात आली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.