दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांकडे सापडले 466 जीवंत प्रवाळ; सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दोघांना घेतलं ताब्यात

पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Pune International Airport) सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 5 एप्रिल रोजी दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना अडवले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये 466 जीवंत प्रवाळ (corals) आढळून आले . ताब्यात घेतलेले प्रवासी ग्रीन चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या बॅगची कसून झडती घेतल्यावर, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची I आणि CITES च्या परिशिष्ट II अंतर्गत समाविष्ट असलेल्या जिवंत प्रवाळांचे 466 नमुने सापडले. ते व्यावसायिक कारणांसाठी घेतल्याचे प्रवाशांनी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. 466 जीवंत प्रवाळ ताब्यात घेतले असून त्यांना मुंबई (Mumbai) येथे पुनर्वसनासाठी पाठवले आहे.

दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांकडे सापडले 466 जीवंत प्रवाळ; सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दोघांना घेतलं ताब्यात
दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांकडे सापडले 466 जीवंत प्रवाळImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 8:17 AM

पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Pune International Airport) सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 5 एप्रिल रोजी दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना अडवले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये 466 जीवंत प्रवाळ (corals) आढळून आले . ताब्यात घेतलेले प्रवासी ग्रीन चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या बॅगची कसून झडती घेतल्यावर, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची I आणि CITES च्या परिशिष्ट II अंतर्गत समाविष्ट असलेल्या जिवंत प्रवाळांचे 466 नमुने सापडले. ते व्यावसायिक कारणांसाठी घेतल्याचे प्रवाशांनी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. 466 जीवंत प्रवाळ ताब्यात घेतले असून त्यांना मुंबई (Mumbai) येथे पुनर्वसनासाठी पाठवले आहे.

कोरल सामान्य पाण्यात जगू शकत नाहीत

कोरल सामान्य पाण्यात जगू शकत नाहीत, त्यांना क्षारयुक्त पाण्याची आवश्यकता असते. त्यांना जगण्यासाठी नैसर्गिक अधिवासाची आवश्यकता असते. दुबईहून आलेल्या दोन व्यक्तींनी प्रावळ पिशवीत आणले होते. किमान 100 प्रवाळ काचेच्या भांड्यात होते तर 366 प्लॅस्टिकच्या पिशवीत होते. कोरल ते मत्स्यालयात ठेवायचे होते आणि नंतर प्रवाशांना ते व्यावसायिक व्यवसायासाठी वापरायचे होते अशी माहिती सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त धनंजय कदम यांनी दिली आहे.

या प्रकरणाची कसून चौकशी करणार

कोरल आत्तापर्यंत कितीवेळा भारतात आणले आहे. त्याचा उपयोग काय केला आहे. किती वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे अशा अनेक गोष्टीची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच दोघांच्याकडून अनेक गोष्टी उघड होतील असं सुध्दा सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Woman Killed The Cat : काठीने बेदम मारहाण केल्याने मांजराचा मृत्यू,एका महिलेवर गुन्हा दाखल

शिकाऱ्याने घोरपडीवर केला बलात्कार; अत्याचाराचा व्हिडीओ पाहून वनविभाग चक्रावलं

सोशल मीडियात खळबळ : हवामान खात्याचेही ट्विटर अकॉउंट हॅक

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.