मुंबई : मुंबईतील एका भाजप आमदाराच्या (Mumbai BJP Mla) पर्सनल असिस्टंटचे फेसबुक अकाऊंट हॅक (Facebook Account) केल्याचा प्रकार पुढे आला आहे. यानंतर फेसबुकवरुन एक आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. या फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉटही व्हायरल करण्यात आला. दरम्यान, हे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर अखेर तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी (Mumbai crime news) याप्रकरणी सोमवारी एफआयआर दाखल करुन घेतला आहे. पुढील तपास केला जातो आहे. विशेष म्हणजे आमदाराने आक्षेपार्ह पोस्टबाबत जेव्हा पीएला विचारणा केली, त्यानंतर हे सगळं प्रकरण उजेडात आलं. फेसबुक अकाऊंट हॅक होण्याचे प्रकारे नवे नाहीत. पण आता फेसबुक अकाऊंट हॅक करुन राजकीय नेत्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी त्याच्या पीएच्या फेसबुक अकांऊट हॅक करुन घेण्यामागचं नेमकं कारण काय, यावरुन चर्चांना उधाण आलंय.
टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आमदार राजहंस सिंह यांच्या पीएने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कुरार पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवरुन आता पोलिसांनी पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे. एका अनोळखी माणसाने आपलं फेसबुक अकाऊंट हॅक करुन आमदारांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
राजहंस सिंह यांच्या पीएचे नाव दिनेश दहिवळकर असून त्यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. आपल्या तक्रारी त्यांनी म्हटलं आहे की 14 ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास माझ्या फेसबुक अकाऊंटवरुन एक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. आपलं अकाऊंट हॅक करुन ही पोस्ट करण्यात असल्याचा त्यांचा आरोर आहे. उत्तर मुंबईतील भाजपचे आमदार राजसंह सिंह हे एक व्यावसायिक देखील आहेत. त्याच्याविषयी माझ्या फेसबुक अकाऊंटवर करण्यात आलेली पोस्ट ही माजं अकाऊंट हॅक करुन गेली होती.
जेव्हा भाजप आमदार राजहंस सिंह यांनी या आक्षेपार्ह पोस्टबाबत मला विचारणा केली, तेव्हा मला माझ्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट दिसली नाही. त्यानंतर एका भाजप कार्यकर्त्यांने मला या आक्षेपार्ह फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट पाठवला आणि तेव्हा फेसबुक अकाऊंट हॅक झालं असल्याची बाब माझ्या निदर्शनास आली असल्याचं दहिवळकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. कुरार पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद करुन घेत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या तपासातून आता पुढे नेमका काय खुलासा होतो, हे पाहणं महत्त्वाचंय.