नागपूर : तरुणांच्या स्मार्टफोनवर सध्या ऑनलाईन जुगाराचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अनेक तरुण या ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात सापडत आहेत. विद्यार्थी, नोकरदार आणि काही व्यावसायिकही ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेले आहेत. नागपुरातील सायबर पोलिसांच्या ही बाब लक्षात आली आहे. काही तक्रारीसुद्धा त्यांच्यापर्यंत आल्या आहेत. पण कायद्यानं बंदी नसल्याने हा ऑनलाईन जुगार सर्रास सुरु आहे, यात दिवसेंदिवस तरुण पिढी अडकत चालली आहे.
यातूनच तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. या ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची मागणी आता जोर धरत आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची गरज व्यक्त केली आहे. याबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
“अनेक तरुण ऑनलाईन जुगाराच्या आहारीत गेले आहेत. पैसै हरल्यामुळे तरुणांमध्ये नैराश्यही येत आहे, काही जण तर आत्महत्येपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची मागणी सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनीही केली आहे.
कर्नाटक सरकार आजपासून (13 सप्टेंबरपासून) सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारा कायदा आणत आहेत, त्यामुळे कर्नाटक सरकार करु शकतं तर महाराष्ट्र सरकार का नाही? असा प्रश्नही त्यानिमित्तानं उपस्थित होतोय.
दरम्यान, या कायद्याचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. बंदी असूनही कर्नाटकात कोणी ऑनलाईन जुगार खेळताना, त्याला प्रोत्साहन देताना सापडल्यास कडक कारवाई होऊ शकते.
देशात ऑनलाईन जुगारावर बंदी नाही. मात्र 2017 मध्ये कायद्याने ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारे तेलंगणा हे पहिले राज्य ठरले होते. आतापर्यंत केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांनी केवळ गेल्या एका वर्षात ऑनलाईन जुगारावर बंदी आणण्यासाठी कायदे आणि सुधारणा आणल्या.
कर्नाटकातील प्रस्तावित बंदीला रमी आणि पोकर पोर्टलद्वारे कायदेशीर आव्हानाला सामोरे जाण्याची अपेक्षा आहे ज्याने अलीकडेच मशरूम केले आहे.
नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांमध्ये दोन हत्येच्याघटना घडल्यामुळे एकच खळबळ उडालीय. काल रात्री
नागपुरात वर्चस्वाच्या वादातून तिघांनी एका युवकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी जवळ असलेल्या गणेश भोजनालय समोर हे हत्याकांड घडलं.
आवेश खान पठाण असे खून झालेल्या युवकाचं नाव असून तीनही मारेकरी फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन मेयो रुग्णालयात रवाना केला. पोलिसांनी मारेकऱ्यांबाबत माहिती काढली असून पोलिसांची दोन पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. या प्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय.
धक्कादायक बाब म्हणजे शनिवारी रात्रीच यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका तरुणाची हत्या झाली होती. शनिवार रात्री अजय भारती याची दारू पिण्याच्या वादातून चुलत भावाने हत्या केली होती. तर रविवारी रात्री आवेश पठाणची हत्या करण्यात आली.
संबंधित बातम्या
मुंबईत महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या, बलात्काराचे 550 गुन्हे, किती आरोपींना अटक?