Mumbai: मुख्यध्यापक सेक्सटॉर्शन रॅकेटचे शिकार! अनोळखी महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ कॉलनंतर काय घडलं?
Mumbai school principal: बीकेसीतील पोलीस स्थानकात एका प्रतिष्ठीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रार केली. हे मुख्याध्यपक सेक्सटॉर्शन रॅकेटचा शिकार ठरले होते. ऑनलाईन पद्धतीनं या मुख्याध्यापकांकडे खंडणी मागण्यात आली.
मुंबई : मुंबईतच (Mumbai Cyber Crime) नव्हे तर संपूर्ण देशभरात डिजीटल व्यवहार (Digital transactions) आणि इंटरनेटनं क्रांती केल्यानतर सायबर गुन्हेही वाढले आहेत. आता एका शाळेच्या मुख्याध्यपक सेक्सटॉर्शन रॅकेट शिकार ठरले. अखेर या मुख्याध्यापकांना पोलीस स्थानक (Police Station) गाठावं लागलं. यानंतर पोलिसांत तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापकांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. मुंबईत असलेल्या एका इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत घडलेल्या या प्रकारानं एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेनं शाळेच्या मुख्याध्यापकांना संपर्क केला. त्यानंतर संपर्क वाढवला. मग एका इमेल द्वारे या मुख्याध्यापकांकडे बिटकॉईनची मागणी करण्यात आली. अन्यथा त्यांचा सगळा डेटा उघड केला जाईल, असा इशारा देण्यात आला. या खळबळजनक प्रकारानं मुख्याध्यापक भयभीत झाले. त्यांनी पोलीस स्थानक गाठलं आणि सगळा प्रकार सायबर पोलिसांना सांगितलाय.
भयंकर…
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, बीकेसीतील पोलीस स्थानकात एका प्रतिष्ठीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रार केली. हे मुख्याध्यपक सेक्सटॉर्शन रॅकेटचा शिकार ठरले होते. ऑनलाईन पद्धतीनं या मुख्याध्यापकांकडे खंडणी मागण्यात आली. खंडणी म्हणून 1200 हजार डॉलर बिटकॉईनची मागणी करण्यात आली होती. मात्र ही खंडणी मागण्याआधी मुख्याध्यापकासोबत जे घडलं ते भयंकरच होतं.
विवस्त्र व्हिडीओ कॉल
एक दिवस शाळेच्या मुख्याध्यापकाला एका महिलेनं संपर्क साधण्यास सांगितलं. त्यानंतर व्हिडीओ कॉलमध्ये ही महिला या मुख्याध्यापकासमोर विवस्त्र समोर आली. तिनं मुख्याध्यपकालाही कपडे काढण्यास सांगितले. पुढचे काही दिवस मुख्याध्यापकाच्या चॅट आणि कॉलला या महिलेनं काहीही उत्तर दिलं नाही. त्यानंतर अचानक एक दिवस एक इ-मेल या मुख्याध्यपकाला आला. या इमेलद्वारे खंडणी मागण्यात आली होती.
तुम्ही केलेली कृती पकडली गेली आहे. तुम्ही जे केलंय, ते मी जगजाहीर करेन. इंटरनेटवर व्हायरल करेन. तसं होऊ द्यायचं नसेल, तर तातडीनं मला 1200 डॉलर किंमतीचे बिटकॉईन द्या, अशी मागणी करत मुख्यध्यापकाला धमकावण्यात आलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मुख्याध्यपाका इ-ई-मेल, त्याची संपूर्ण प्रोफाईल, संपूर्ण डाटा, पीसी, हे हॅक करण्यात आलं असल्याचाही दावा मेलमध्ये करण्यात आला होता.
सतर्कता गरजेची
सायबर तज्ज्ञ रितेश भाटिया यांनाही अशाच प्रकार धमकी मिळाली होती, असं त्यांनी म्हटलंय. मात्र मी या सगळ्या धमक्यांकडे दुर्लक्ष केलं. अशा प्रकारे आपली सगळी माहिती असल्याचा दावा करुन कुणीली आपल्याला लुबाडू शकतं. तुम्ही एखादी अश्लील वेबसाईट पाहिली, की तुम्हाला असा मेसेज आल्यानंतर माणसं अधिक गोंधळून जातात. मात्र या सगळ्याकडे सतर्कता बाळगण्याचीही तितकची आवश्यकात असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.
संबंधित बातम्या :
मुलीच्या नावे बनावट खाते, अश्लील व्हिडीओ कॉल करुन मेहुण्यांनी तरुणांना लुटलं
RBI Alert : केंद्रीय बँकेच्या नावाने पैसे उकळणारी टोळी सक्रिय, ऑनलाईन फसवणुकीपासून कसे सावध राहाल?
पुण्यात महिलेला 65 हजारांचा गंडा, ऑनलाईन केक बूक करताना फसवणूक, OTP सांगणं महागात