भाजपच्या माजी आमदाराचं फेक फेसबुक प्रोफाईल, मित्रांकडे पैशाची मागणी

नागपूरमधीस भाजप नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांचं फेक फेसबूक आयडी तयार करण्यात आलं होतं. (Anil Sole Fake Facebook account)

भाजपच्या माजी आमदाराचं फेक फेसबुक प्रोफाईल, मित्रांकडे पैशाची मागणी
भाजप नेते अनिल सोले
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 2:11 PM

नागपूर : नागपुरात भाजपच्या माजी आमदाराचं फेक फेसबुक प्रोफाईल तयार करण्यात आलं. या बनावट अकाऊण्टवरुन ओळखीच्या व्यक्तींकडे पैसे मागण्यात आले. भाजप नेते अनिल सोले (Anil Sole) यांनी तक्रार केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. फेसबुकवर ‘रिपोर्ट ॲंड ब्लॅाक’ या ऑप्शनचा वापर करण्याचं आवाहन सोशल मीडिया तज्ज्ञ करत आहेत. (Nagpur BJP Former MLC Anil Sole Fake Facebook account accuse demands money)

नागपूरमधीस भाजप नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांचं फेक फेसबूक आयडी तयार करण्यात आलं होतं. त्यांच्या फेक आयडीवरुन मित्रांना पैसे मागण्यात आले. सोले यांनी तक्रार केल्यानंतर अनेकांची फसवणूक टळली.

कोण आहेत अनिल सोले?

  • नागपूर भाजपचे माजी शहराध्यक्ष
  • नागपूर पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे माजी आमदार
  • 2014 मध्ये नितीन गडकरींच्या जागी नागपूर पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवड
  • 1992, 1997, 2002, 2007 आणि 2012 असे सलग पाच वेळा नागपूर महापालिकेचे नगरसेवक
  • 2012 मध्ये नागपूरचे महापौर
  • भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष (1984)

नागपुरात महिनाभरात एक हजार फेक आयडी

गेल्या काही दिवसांत अशाच प्रकारे फेक फेसबूक आयडी तयार करण्याचे प्रकार वाढले आहेत. तुमच्या आमच्या ओळखीतील अनेकांचे फेक आयडी तयार करुन सायबर गुन्हेगारांनी पैसे मागितल्याचे प्रकार घडत आहेत. नागपूर जिल्हयात गेल्या काही महिन्यात साधारण एक हजारच्या आसपास फेक आयडी तयार केल्याचं उघडकीस आलं आहे. (Anil Sole Fake Facebook account)

काही जण याबाबत तक्रार नोंदवतात, पण काही युजर्स तक्रार दाखल करायला जात नाहीत. त्यामुळेच फेसबूकवर फेक आयडी क्रिएट करणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण वाढलं आहे. अशा वेळेस फेसबूक वापरणाऱ्यांनी फेसबुकवरील ‘रिपोर्ट ॲंड ब्लॅाक’ या ऑप्शनचा वापर वाढवावा, असं आवाहन सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या : पिंपरी-चिंचवडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे फेसबुक अकाऊण्ट हॅक, मित्रांकडे पैशांची मागणी

हॉस्पिटलमध्ये आहे, दहा हजार पाठवा, पोलीस अधीक्षकांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंटवर पैशांची मागणी

(Nagpur BJP Former MLC Anil Sole Fake Facebook account accuse demands money)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.