बोगस वेबसाईट बनवून फसवणूक! रिपब्लिक ऑफ कॅमरुनमधील गँगला अटक, नागपूर पोलिसांची दिल्लीत मोठी कारवाई

Nagpur crime news : नागपुरातील उद्योजक भूषण साबळे यांची एक कंपनी आहे. ते ऑनलाइन व्यवसाय करतात. आरोपीने साबळे यांच्या कंपनीची बनावट वेबसाईटवर तयार केली. या वेबसाईटवरची इंडिया मार्टवर नोंदणी केली.

बोगस वेबसाईट बनवून फसवणूक! रिपब्लिक ऑफ कॅमरुनमधील गँगला अटक, नागपूर पोलिसांची दिल्लीत मोठी कारवाई
नागपूर पोलिसांची मोठी कारवाईImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 11:57 AM

नागपूर : डिजिटल विश्वात जगत असताना डिजिटल गोष्टी, डिजिटल अर्थकारण, डिजिटल (Digital Shopping) खरेदी, इत्यादी गोष्टींचा वापर वाढला. मात्र या वाढत्या वापरासोबत याचा गैरफायदा घेणारेही लोकं तितकेच वाढलेत. चोरीच्या, फसवणुकीच्या नवनव्या क्लुप्त्या करुन लोकांना गंडवण्याचे अनेक प्रकार ऑनलाईनच्या (Online fraud news) चक्करमध्ये सुरु झालेत. त्यामुळे खबरदारी घेण्याचंही वारंवार आव्हान केलं जातं. अशातच नागपूर पोलिसांनी दिल्लीत एक मोठी कारवाई केली आहे. बोगस वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांना एका मोठ्या गँगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या गँगच्या म्होरक्यासह एकूण तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ही गँग रिपब्लिक ऑफ कॅमरुनमधली (Republic of Cameroon) असल्याचं समोर आलंय. ऑनलाईन वस्तूंची विक्री करतो, असा दावा करत या गँगने अनेकांना गंडा घातला. अखेर जेव्हा या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल झाली, त्यानंतर नागपूर पोलिसांनी सायबर क्राईम विभागाच्या पथकाची मदत घेत या संपूर्ण प्रकरणाला उलगडा केलाय.

नागपुरातील उद्योजक भूषण साबळे यांची एक कंपनी आहे. ते ऑनलाइन व्यवसाय करतात. आरोपीने साबळे यांच्या कंपनीची बनावट वेबसाईटवर तयार केली. या वेबसाईटवरची इंडिया मार्टवर नोंदणी केली. याद्वारे त्यांनी ऑनलाइन वस्तू विक्री करत असल्याची बतावणी करत व्यवहार सुरू केला.

कळलं कसं?

मात्र 11 ऑगस्ट ला प्रितिष नावाच्या व्यक्तीचा त्यांना फोन आला आणि त्याने रिफाईंड शुगर बद्दल विचारणा केली. साबळे यांनी आपण रिफाईंड शुगरचा व्यवसाय करत नसल्याचं सांगितलं. त्यावरून साबळे यांना संशय आला आणि त्यांनी गुगलवर सर्च केलं असता त्यांच्या कंपनीची बनावट वेबसाईटवर असल्याचं दिसलं. त्यावर त्यांचा जीएसटी नंबरसुद्धा होता.

हे सुद्धा वाचा

ही बाब निदर्शनास आल्यानंतर साबळे यांनी लगेच सायबर पोलिसात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी दिल्लीत असल्याचं निष्पन्न झालं आणि पोलिसांनी दिल्लीला जाऊन सूत्रधारसह तीन आरोपींना अटक केली. ते रिपब्लिक ऑफ कॅमेरून देशाचे असल्याची माहिती नागपूरच्या सायबर सेलचे डीसीबी बसवराज तेली यांनी दिली. तीन आरोपींना अटक तर झाली मात्र यामागे मोठी टोळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या तपासातून आणखी खळबळजनक खुलासे होण्याची आणि या गँगमधील इतरही अनेकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.