पनवेलच्या अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल, दोघांना उत्तर प्रदेशातून अटक
सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो व्हायरल करुन तिची बदनामी करणाऱ्या दोघांना उत्तर प्रदेश येथून अटक करण्याची कामगिरी तळोजा पोलिसांनी केली आहे. मोहम्मद आरिफ मनीर अहमद (22) आणि यासीन अहमद नसिरुद्दिन अहमद (22) अशी या अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पनवेल : सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो व्हायरल करुन तिची बदनामी करणाऱ्या दोघांना उत्तर प्रदेश येथून अटक करण्याची कामगिरी तळोजा पोलिसांनी केली आहे. मोहम्मद आरिफ मनीर अहमद (22) आणि यासीन अहमद नसिरुद्दिन अहमद (22) अशी या अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी गेल्या जून महिन्यामध्ये पीडित मुलीचे फोटो व्हॉट्सअॅपवरुन व्हायरल केले होते.
व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील फोटो व्हायरल
या घटनेतील पीडित अल्पवयीन ही मूळची उत्तर प्रदेशातील असून ती वडिलांसोबत तळोजा येथे राहाते. गेल्या जून महिन्यात तळोजा भागातील काही तरुणांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पीडित मुलीचे अश्लील फोटो व्हायरल झाले होते. ही बाब पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तळोजा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती.
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मदतीने तपास
त्यानुसार, पोलिसांनी अज्ञाताविरोधात पॉक्सोसह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. या प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पीडित मुलीचे फोटो व्हायरल झाले होते, त्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक तपास केला.
तपासादरम्यान, फोटो व्हायरल करणारे उत्तर प्रदेश राज्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान नांगरे, पोलीस नाईक विजय पाटील, निवृत्ती चंदेवाड, वैभव शिंदे यांचे पथक उत्तर प्रदेश येथे रवाना करण्यात आले होते. सदर पथकाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरुन अटक केली.
तपासादरम्यान, फोटो व्हायरल करणारे उत्तर प्रदेश राज्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलीस निरीक्षक संजय नाळे करीत होते. 3 महिन्यांच्या तपासानंतर आरोपी पकडण्याचे आदेश देण्यात आले.
न्यायालयाने या दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या दोघांचेही मोबाईल फोन जप्त करुन त्यांची तपासणी सुरु आहे.
फेसबुकवरील मैत्री पडली महाग, नवी मुंबईत विधवा महिलेला सायबर गुन्हेगारांनी घातला 13 लाखांचा गंडाhttps://t.co/F8eAPXdBZB#Facebook |#Friendship |#Fraud |#Women
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 25, 2021
संबंधित बातम्या :
पाणी पुरीवरुन पती-पत्नीमध्ये क्षुल्लक वाद; पत्नीचे टोकाचं पाऊल, विष प्राशन करुन आत्महत्या