अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणं भोवलं, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या माजी परीक्षा मंडळ संचालकासह चौघांवर आरोपपत्र

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या माजी परीक्षा मंडळ संचालक डॉ. राजाराम कोकरे यांच्यासह चौघांविरुद्ध परीक्षा निकाल गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणं भोवलं, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या माजी परीक्षा मंडळ संचालकासह चौघांवर आरोपपत्र
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 1:55 PM

सोलापूर: पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या माजी परीक्षा मंडळ संचालक डॉ. राजाराम कोकरे यांच्यासह चौघांविरुद्ध पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याप्रकरणी चौकशी केल्यानंतरर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. (Solapur Police submit Charge sheet against Rajaram Kokare and other three peoples regarding malpractice in exam of Punyashlok Ahilyadevi Holkar University)

25 जूनला पुढील सुनावणी

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याप्रकरणाची पहिली सुनावणी 22 मार्चला झाली होती. पुढील सुनावणी आता 25 जून रोजी होणार आहे. डॉ. कोकणे यांच्यासह यंत्रणा विश्लेषक प्रशांत रावसाहेब चोरमुले, सुविधा समन्वय हसन शेख , प्रोग्रॅमर प्रवीण प्रकाश गायकवाड यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.

पैसे घेऊन गुण वाढ केल्याचा आरोप

डॉ. कोकणे यांच्यासह यंत्रणा विश्लेषक प्रशांत रावसाहेब चोरमुले, सुविधा समन्वय हसन शेख , प्रोग्रॅमर प्रवीण प्रकाश गायकवाड यांना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण वाढवून त्यांना उत्तीर्ण केल्याचा आरोप करण्यात आला होता. आरोपींवर पैसे घेऊन गुणवाढ करणे कुलगुरूंचा पासवर्ड हॅक करणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.

2020 मध्ये प्रकरण उघडकीस

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याचं प्रकरण 2020 मध्ये उघडकीस आलं होतं. त्यावेळी आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठामध्ये खळबळ उडाली होती. सिनेट सदस्यांनी देखील याबाबात आक्रमक भूमिका घेतली होती. यासंबंधीचं एक प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

विद्यापीठ विद्यार्थ्यांचं हित पाहून परीक्षा फी परत करणार

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थी हित पाहून परीक्षा फी 35 लाख  दिले महाविद्यालयाकडे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 19.26 टक्के शुल्क माफ केले आहे. विद्यापीठाच्या योजनेचा वीस हजार विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. 35 लाख रुपये इतकी रक्कम महाविद्यालयाकडे विद्यापीठाने वर्ग केली. महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना पैसे फीचे पैसे परत मिळणार आहे.

संबंधित बातम्या:

Maratha Reservation | आम्ही हात जोडून विनंती केलीय, आता निर्णय पंतप्रधान मोदी घेतील : संजय राऊत

मराठा आरक्षणासाठी नक्षलवाद्यांनी काढलं पत्रक, संभाजीराजे छत्रपती म्हणतात…

(Solapur Police submit Charge sheet against Rajaram Kokare and other three peoples regarding malpractice in exam of Punyashlok Ahilyadevi Holkar University)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.