Thane: तुम्हाला रक्ताची गरज आहे? सावधान! सायबर क्राईमचा बळी ठरण्याआधी ही बातमी वाचा

ठाणे, कधी केवायसी अपडेट तर कधी खाते बंद होण्याचे कारण देत ऑनलाईन लिंक (online link) पाठवून सर्वसामान्यांना लुटणारे सायबर भामट्यांनी (cyber criminal) आता रक्‍ताची गरज असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच टार्गेट केल्याचा भयंकर प्रकार ठाण्यात समोर आला आहे. माणुसकी विसरलेल्या या चोरांनी रक्‍तपेढीच्या (Blood Bank) नावाने रक्‍ताची गरज असणाऱ्यांना संपर्क साधून त्यांच्या बँक अकाऊंटवर डल्ला मारला आहे. […]

Thane: तुम्हाला रक्ताची गरज आहे? सावधान! सायबर क्राईमचा बळी ठरण्याआधी ही बातमी वाचा
विस्कीची बाटली ऑनलाईन मागवणे महिलेला पडले महागात
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 8:34 AM

ठाणे, कधी केवायसी अपडेट तर कधी खाते बंद होण्याचे कारण देत ऑनलाईन लिंक (online link) पाठवून सर्वसामान्यांना लुटणारे सायबर भामट्यांनी (cyber criminal) आता रक्‍ताची गरज असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच टार्गेट केल्याचा भयंकर प्रकार ठाण्यात समोर आला आहे. माणुसकी विसरलेल्या या चोरांनी रक्‍तपेढीच्या (Blood Bank) नावाने रक्‍ताची गरज असणाऱ्यांना संपर्क साधून त्यांच्या बँक अकाऊंटवर डल्ला मारला आहे. वारंवार अशाच घटना घडल्याने चोरट्यांच्या फसवणुकीला बळी पडलेल्या प्रशांत ठुकरुल यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील नामांकित रक्तपेढी अशी ओळखा असलेल्या ब्लड ‘लाइन’ या रक्‍तपेढीच्या नावे गरजू रुग्णांना रक्‍त मिळवून देण्याचे आश्वासन देत हजारो रुपयांचा गंडा घातला जात आहे.

अनेक गरजू नागरिक या रक्‍तपेढीमधून रक्‍त घेण्यासाठी तेथील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात. साधारणपणे निगेटिव्ह श्रेणीतील रक्‍त उपलब्ध नसल्यास रक्‍तपेढीकडून तसे रुग्णांच्या नातेवाईकांना कळविण्यात येते. मात्र त्यानंतर लगेचच खासगी मोबाईल क्रमांकावरून रुग्णांच्या नातेवाईकांना ‘फोन करत रक्‍त उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. हीच कार्यपद्धती पुढे गरजूंना सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकवतात.

पाच रुपयांच्या बदल्यात हजारोंची वाटमारी

रक्‍त उपलब्ध असल्याचे समजताच ते मिळवण्यासाठी खासगी मोबाईल क्रमांकावरील भामटे संबंधितांना ऑनलाइन लिंक ‘पाठवतात. त्यावर सुरुवातीला रक्‍तासाठी पाच रुपये पाठवा असे सांगितले जाते. ही रक्‍कम येताच संबंधितांच्या बँक खात्यातील संपूर्ण बॅलन्स रिकामा केला जातो.

हे सुद्धा वाचा

रक्‍तपेढीचे आवाहन

ब्लड लाइन ही रक्‍तपेढी कोणत्याही प्रकारे रक्‍त देण्यापूर्वी पैसे स्वीकारत नाही. रक्‍त दिल्यानंतरच ना नफा ना तोटा या धर्तीवर पैसे घेण्यात येतात. ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्याची कोणतीही सुविधा रक्‍तपेढीने दिलेली नाही. त्यामुळे गरजू रुग्णांना रक्‍त हवे असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी थेट रक्‍तपेढीत यावे, असे आवाहन डॉ. शिल्पा जैन यांनी केले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.