तुळजाभवानीची पूजा, अभिषेक करण्याचे आमिष दाखवत भाविकांची ऑनलाईन लूट, 4 वेबसाईट चालकांवर गुन्हा
बोगस वेबसाईटवरुन तुळजाभवानी देवीच्या भाविकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी 4 वेबसाईट चालकांवर तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेबसाईटवरुन भक्तांची आर्थिक लूट करण्यात येत होती.
उस्मानाबाद : बोगस वेबसाईटवरुन तुळजाभवानी देवीच्या भाविकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी 4 वेबसाईट चालकांवर तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेबसाईटवरुन भक्तांची आर्थिक लूट करण्यात येत होती.
तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तुळजाभवानी देवीच्या नावाने बोगस वेबसाईट काढून भाविकांची विविध पुजा करण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक करणाऱ्या 4 वेबसाईटच्या चालकांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक अनिल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तुळजाभवानी देवीच्या भाविकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी चौकशी आणि कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, योगेश खरमाटे उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त सदस्य श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर, रोहन शिंदे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन यांनी चौकशी केली.
तुळजाभवानी मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाईट www.shrituljabhavani.org असताना बोगस वेबसाईट तयार करुन काही मंडळी भाविकांकडुन देवीच्या विविध पूजा आणि विधी करण्याच्या नावाखाली आर्थिक रक्कम ऑनलाईन घेत होते.
अज्ञात लोकांनी www.tuljabhawanipujari.com, www.tuljabhwanimandir.org, www.shrituljabhavani.com, wwww.epuja.co.in या चार वेबसाईट सुरु करुन भाविकांची लूट केली असल्याचे स्पष्ट झाले, विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तुळजाभवानी नवरात्र काळात राजरोस सुरु होता. याबाबत बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या बोगस वेबसाईटवरुन तुळजाभवानी देवीच्या अभिषेक, अलंकार महापूजा, खण-नारळ ओटी पूजा, जागरण गोंधळ, अन्नदान आशा पूजा करण्याचे अमिश दाखवुन ऑनलाईन पैसे जमा करून घेतले जात होते. तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420 फसवणूक, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66 सी आणि डी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ज्या भक्तांनी यासह अन्य बोगस वेबसाईटवर दिलेल्या आमिषाला बळी पडून पूजा आणि विधीसाठी पैसे ट्रान्सफर केले आहेत त्यांनी मंदिर संस्थानशी संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
नवरात्र महोत्सवात तुळजाभवानी देवीचे, एक लाख 16 हजार भाविकांनी घेतले ई-दर्शन
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी देवीजींच्या दर्शनासाठी ई-दर्शन पासची सुविधा मंदिर संस्थानने उपलब्ध करुन दिली होती. त्याचा यंदाच्या नवरात्र महोत्सव काळात एक लाख 16 हजार भाविकांनी लाभ घेतला आहे. या ई-दर्शन सेवेचाही सेवा सुरु झाल्यापासून 30 लाख 59 हजार 742 भाविकांनी लाभ घेतला आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातील विविध राज्यांतील भाविकांनी ई-दर्शन पासचा लाभ घेतला आहेतच, त्याच बरोबर विदेशातील भाविकांनीही या सेवेचा लाभ घेतला आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीचे दोन डोस (दोन लस) घेतलेल्या भाविकांना श्री. देविजींच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आलेला होता. तसेच 65 वर्षावरिल ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्त, गरोदर स्त्रिया आणि दहा वर्षाखालील बालकांना प्रवेश बंद होता.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जास्तीत जास्त नागरिकांना ऑनलाईन ई-दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते.
सध्याचे युग हे माहिती तंत्राज्ञानाचे युग आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग हा अतीशय अफाट आहे, श्री.दिवेगावकर यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या (NIC) मदतीने जिल्ह्यांच्या संकेत स्थळावरुन जनतेसाठी विविध विभागाच्या ऑनलाईन सेवा पुरवीण्यात जिल्हा प्रशासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यात एन.आय.सी.ने महत्वाचा वाटा उचलला आहे, याचाच एक भाग म्हणून नवरात्र महोत्सवात बहुतांशी भाविकांना घरबसल्या श्री. तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी http://osmanabad.gov.in या संकेत स्थळावर आणि shri TuljabhawaniLive या Mobile App द्वारे ई-लाईव्ह दर्शन सुविधाही मंदिर प्रशासनाच्या साहाय्याने पुरवण्यात आलेली आहे.
या सेवेचा लाभ विदेशातील नागरिकांनीही घेतला आहे. या नवरात्र महोत्सवात अमेरिका (1797), युनायटेड अरब देश (232), कॅनडा (246), युनायटेड किंगडम (294), सिंगापूर (179),ऑस्ट्रोलीया (131), स्वित्झर्लंड(83), जर्मनी (83) व ओमन (39) अशा अनेक देशातील (कंसात दर्शवीलेल्या संख्ये इतक्या) भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. विशेष बाब म्हणजे यापैकी जास्तीत जास्त भाविकांनी मोबाईलवरुन या सुविधेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी पी.एन.रुकमे यांनी दिली आहे.
नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक नीवा जैन, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे , व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले , जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांच्यासह आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पुढाकार घेतला.
कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश बंदी, तर तुळजापुरात संचारबंदी https://t.co/v83RXm1d3D @OsmanabadPolice @ranajagjitsinh1 @OfficeofUT @AjitPawarSpeaks #tuljapur #KojagiriPaurnima #navratri2021 #Navratri #Osmanabad #collector #TuljapurCurfew
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021
संबंधित बातम्या :
PHOTO | Tulja Bhavani Devi | दुर्गाअष्टमीनिमित्त तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार पूजा