Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाला मोठं वळण, खुन्यांची ओळख अखेर पटली

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा आरोप असलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं ओखळलं आहे. अंदुरे आणि कळसकर यांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानं साक्षीदाराने सांगितलं.

Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाला मोठं वळण, खुन्यांची ओळख अखेर पटली
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना साक्षीरादाने ओळखलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 10:52 PM

पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समिती अर्थात अंनिसद्वारे समाजातून अनिष्ठ रुढी, परंपरा विरोधात आवाज उठवणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्या खुन्यांची ओळख अखेर पटली आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं दाभोलकरांच्या खुन्यांचे फोटो ओळखले आहेत. हत्येचा आरोप असलेल्या सचिन अंदुरे (Sachin Andure) आणि शरद कळसकर (Sharad kalaskar) यांना हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं ओखळलं आहे. अंदुरे आणि कळसकर यांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानं साक्षीदाराने सांगितलं. साक्षीदाराने आरोपींना ओळखल्यामुळे अखेर दाभोलकर कुटुंबीय आणि असंख्य अंनिस कार्यकर्त्यांना न्याय मिळण्याची आशा वाटत आहे.

साक्षीदाराच्या साक्षीत काय?

साक्षीदाराने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी पुलावर एक पुरुष सफाई कर्मचारी आणि एक महिला पुलाच्या दुभाजकावर बसले होते. पुलाजवळी एका झाडावर एक माकड आलं, तसंच कावळ्यांचा आवाजही आला. तिकडे पाहत असतानाच दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पुलावर चालत असलेल्या एकाला गोळ्या झाडल्या. ती व्यक्ती काही क्षणात कोसळली. हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या दिशेनं पळाले. त्यानंतर ते दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला पाहिलं आणि आम्ही कामावर निघून गेलो. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 23 मार्च रोजी होणार आहे.

9 वर्षानंतर न्याय मिळणार?

पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वा सात वाजण्यापूर्वी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोळकर कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचं यापूर्वी उघडकीस आलं होतं. मारेकऱ्यांना दाभोळकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, असेही तपासात समोर आले होते.

इतर बातम्या :

‘तुमच्या निष्काळजीपणामुळेच जिल्ह्याची बदनामी’, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

धक्कादायक : पुण्यात 11 वर्षीय मुलीवर बाप, भाऊ, आजोबा आणि चुलत मामाकडूनच लैंगिक अत्याचार!

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.