खुर्चीवर फक्त ठाकूरच बसू शकतात, म्हणत दलित तरुणाला बेदम मारहाण
या मारहाणीत दलित तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे, तसेच शरीरावरही जखमा झाल्या आहेत.
छतरपूर : ग्राम पंचायत कार्यालयात खुर्चीवर बसला (Sitting on a Chair) म्हणून एका 30 वर्षीय दलित तरुणाला बेदम मारहाण (Beating) केल्याची धक्कादायक मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या मारहाणीत पीडित तरुण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. मात्र बिजावरचे पोलीस सब डिव्हिजन अधिकारी रघु केसरी यांनी कुटुंबीयांच्या या आरोपाचे खंडन केले आहे. शनिवारी ही घटना जिल्हा मुख्यालयापासून 10 किमी अंतरावर चौका गावात घडली आहे.
पोलिसांनी ही घटना आरोपी आणि पीडित यांच्यातील वादातून घडल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी मटगुआन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तक्रारीनंतर कोणतीही कारवाई करण्यात आले नसल्याचे पीडित तरुणाच्या पत्नीने सांगितले.
काय आहे प्रकरण ?
पीडित तरुण कपिल धारा योजनेंतर्गत विहीर बांधकामासाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयात आला होता. यावेळी तो पंचायत कार्यालयातील खुर्चीवर बसल्याने रोहित सिंह ठाकूरने यावर आक्षेप घेतला.
तसेच या खुर्चीवर केवळ ठाकूर बसू शकतात म्हणत रोहितने पीडित तरुणाला मारहाण केली. इतकेच नाही तर दुसऱ्या दिवशी रविवारीही रोहित आणि त्याच्या साथीदारांनी मिळून पीडिताच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली, असे माहिती चौका ग्रामपंचायत सचिव अरविंदकुमार अहिरवार यांनी सांगितले.
जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु
या मारहाणीत दलित तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे, तसेच शरीरावरही जखमा झाल्या आहेत. जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चौकाचे गावचे सरपंच कृष्णा गोपाल अहिरवार यांनीही पीडिताच्या पत्नीच्या आरोपाला दुजोरा दिला आहे. पीडित तरुण कारमधून ग्रामपंचायत कार्यालयात आला आणि खुर्चीवर बसल्याने त्याला मारहाण केल्याचे अहिरवार म्हणाले.