बंगळुरू | 2 ऑगस्ट 2023 : एका डान्स टीचरने (dance teacher) माजी प्रेयसीवर वर्षभर वारंवार अत्याचार करून त्याचे फोटो व व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल (crime news) केल्याचा आरोप आहे. अखेर त्या 23 वर्षीय पीडितेने हिंमत करून पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रविवारी 28 वर्षीय डान्स टीचरसह त्याच्या दोन मित्रांनाही अटक केली आहे. अँडी असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.
सोशल मीडियावरील मैत्रीचे झाले प्रेमात रुपांतर
मिळालेल्या माहितीनुसार अँडी हा विद्यारण्यपुरा येथील रहिवासी असून त्याचे मित्रही आसपासच्याच भागात राहतात. पीडित तरूणी बेरोजगार असून आई-वडिलांसोबत राहते. दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून तिची आरोपीशी ओळख व मैत्री झाली, ज्याचे हळहळू प्रेमात रुपांतर झाले. ते दोघे एकत्र असताना त्यांनी काही खासगी फोटो काढले व व्हिडीओही बनवले होते. ते दोघे प्रेमात होते, तेव्हा जॉर्ज पीडितेला त्याच्या घरी घेऊन गेला. याशिवाय दोघेही शहराबाहेर फिरायला जायचे आणि एकत्र वेळ घालवायचे. आरोपीने त्यांचे अनेक खासगी क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केले होते.
3000 ते 5000 रुपये घेऊन मित्रांशी संबंध ठेवण्यास भाग पाडले
जून 2021 मध्ये पीडित तरूणीला आरोपीचं खरं रूप समजलं तेव्हा तिने त्याच्याशी असलेलं नातं तोडलं. पण ते त्याला सहन झालं नाही आणि त्याने खासगी फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी पीडितेला दिली. हीच धमकी देत त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केला.
एवढंच नव्हे तर आरोपीने ही गोष्ट त्याच्या मित्रांनाही सांगितली. त्यानंतर त्याने पीडितेला जबरदस्ती त्याच्या दोन मित्रांना भेटवले आणि त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यांनीही ते खासगी क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवतीशी संबंध ठेवण्यासाठी आरोपीने त्याच्या मित्रांकडून 3000 ते 5000 रुपयेही वसूल केले. अखरे पीडितेने धैर्य दाखवत पोलिसांत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.