भयानक… भयानक… अशी पोरगी नसलेलीच बरी… क्रूरतेचा कळस, जन्मदात्यांनाच घरात डांबले, बॅट आणि काठीने….

| Updated on: Jun 23, 2023 | 12:34 PM

वृद्ध मात्यापित्यांची सेवा करण्याऐवजी त्यांना घरातच डांबून मुलीने मारहा केल्याची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शुल्लक मोहापायी तिने हे कृत्य केले असले तरी त्याचा तिला जराही पश्चाताप नसल्याचे दिसते.

भयानक... भयानक... अशी पोरगी नसलेलीच बरी... क्रूरतेचा कळस, जन्मदात्यांनाच घरात डांबले, बॅट आणि काठीने....
Follow us on

भोपाळ : आई-वडिलांची सेवा करून त्यातच पुण्य मानणारी एक पिढी होती, मात्र सध्याच्या कलियुगात पैसाच हे सर्वस्व असून त्यासाठी लोकं कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे वारंवार दिसते. मध्ये प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका हाय-प्रोफाईल कुटुंबात मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादात (dispute over property) कलयुगी मुलीचा (cruel daughter) भयानक अवतार पहायला मिळाला. आई-वडिलांच्या संपत्तीचा लोभ असलेल्या लेकीने प्रथम त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये मागितले.

मात्र पालकांनी एवढी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवल्यावर तिने आपल्याच मुलासोबत मिळून स्वत:च्याच पालकांना डांबून ठेवत त्यांना बॅट व काठीने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे क्रूर कृत्य सुरू असून या घटनेची माहिती मिळताच अखेर पोलिसांनी वृद्ध दांपत्याची सुटका केली.

सीएस सक्सेना व त्यांनी पत्वी कनक सक्सेना हे दोघेही भोपाळच्या अरोरा कॉलनीमध्ये राहतात. त्यांची मुलगी निधी हिचे सासरी भांडण झाल्यानतर ती आई-वडिलांकडे रहायला आली होती. काही दिवसानंतर तिने पालकांकडे 4 कोटी रुपयांची मागणी केली असता त्यांनी एवढी रक्कम नसल्याचे सांगत पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. यामुळ भडकलेल्या निधीने तिच्या मुलाची मदत घेत आपल्याच जन्मदात्यांना मारहाण केली. तब्बल चार महिने तिने त्यांना घरात डांबूनही ठेवले. शेजाऱ्यांना ही गोष्ट कळताचा त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली असता घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी वृद्ध दांपत्याला सोडवले.

वृद्ध दांपत्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा

अरेरा कॉलनीत राहणाऱ्या बुजुर्ग दांपत्याला मुलीने अमानुषपणे मारहाण केली आहे. त्यांच्या शरीरावर गंभीर दुखापतीचे वळ दिसत आहेत. या दांपत्याची मुलगी आणि नातू दोघेही मिळून त्यांना बॅट व काठीने क्रूरपणे मारत होते. सध्या या दांप्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

4 महिने घरातच डांबले

वृद्ध आई-वडिलांशी क्रूरपणे वागणाऱ्या या मुलीने गेल्या चार महिन्यांपासून त्या दोघांनाही घरात डांबून ठेवले होते. ती त्यांना मारहाण तर करत असेच पण त्यांना इतर कोणालाही भेटण्याचीही बंदी घालण्यात आली होती. या वृद्ध इसमाच्या मित्रानेही त्या मुलीच्या क्रूरपणाबद्दल पोलिसांत लेखी अर्ज दिला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दांपत्याची सुटका करून रुग्णालयात दाखल केले.

ते आहेत निवृत्त बँक अधिकारी

सीएस सक्सेना हे निवृत्त बँक अधिकारी असून ते बँक ऑफ इंडियातून मॅनेजर पदावरून निवृत्त झाले होते. त्यांची मुलगी गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्याकडे पैसे मागत होती आणि ते न मिळाल्याने आपल्याच जन्मदात्यांशी क्रूरपणे वागत अमानुष मारहणाही करत होती. हबीबगंज पोलिसांनी त्या मुलीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.