Dawood Ibrahim | दाऊदच्या साथीदारांच्या ठिकाण्यांवर छापेमारी, मुंबईतील 20 अड्ड्यांवर NIA च्या धाडी
कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या टोळीतील शार्पशूटर, तस्कर अशा साथीदारांच्या 20 हून अधिक ठिकाण्यांवर एनआयएतर्फे धाड टाकण्यात आल्याची माहिती आज तकने दिली आहे.
मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने (NIA) आज मुंबईतील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे 20 अड्डे दाऊदच्या शार्प शूटर, तस्करांशी संबंधित आहेत. याशिवाय अनेक हवाला ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे दाऊद इब्राहिमसाठी हा मोठा दणका (Mumbai Crime News) मानला जातो. नागपाडा, भेंडी बाजार, मुंब्रा, भिवंडी, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रुझ यासारख्या वीसहून अधिक ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत. एनआयएच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याची माहिती आहे.
National Investigation Agency (NIA) conducts raids at more than one dozen locations in Mumbai against Pakistan-based gangster Dawood Ibrahim’s associates and a few hawala operators pic.twitter.com/mAUq4w8gul
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 9, 2022
काय आहे प्रकरण?
कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या ठिकाण्यांवर छापेमारी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईत सोमवारी सकाळी ही छापेमारी केल्याची माहिती आहे. दाऊदच्या टोळीतील गुंडांच्या 20 हून अधिक ठिकाण्यांवर धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबईतील गोरेगाव, बोरीवली, सांताक्रुझ, नागपाडा, भेंडी बाजार यासह जवळच्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, भिवंडी यासारख्या वीसहून अधिक ठिकाणी एनआयएने छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एनआयएच्या हाती महत्त्वाची माहिती लागल्याचं बोललं जात आहे.