मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) निकटवर्तीयांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने छापेमारी केलीय. मुंबई आणि मिरा-भाईंदरमध्ये मिळून एकूण 29 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. त्यात मोठी रक्कम आणि शस्त्रास्त्रे जप्त (Weapons confiscated) करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. एनआयएने एका प्रकरणात मुंबई आयुक्तालय हद्दीतील 24 ठिकाणी आणि मीरा-भाईंदर आयुक्तालय हद्दीतील 5 ठिकाणी छापे (NIA raid) टाकले. त्यावेळी दाऊदच्या संशयित साथिदारांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची कागदपत्रे, रोख रक्कम आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
एनआयएने ज्या प्रकरणात छापेमारी केली ते हाजी अनीस म्हणजे अनीस इब्राहिम शेख, शकील शेख उर्फ छोटा शकील, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्भ दाऊद इब्राहिम कासकर आणि त्याच्या साथिदारांचा समावेश असलेल्या डी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याची माहिती एएनआयकडून देण्यात आलीय. तसंच दाऊदच्या संशयित साथिदारांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची कागदपत्रे, रोख रक्कम आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आल्याची माहितीही एनआयएने दिली आहे.
NIA detains Salim Fruit following a raid at his residence in Mumbai. He is an associate of Dawood Ibrahim. Some important documents also seized.
Raids at several locations in Mumbai linked to gangster Dawood Ibrahim’s associates and a few hawala operators are underway by NIA. pic.twitter.com/v1pdEw1RJw
— ANI (@ANI) May 9, 2022
एनआयएची टीम मुंबईच्या गोवावाला कंपांऊंडमध्येही छापेमारी करते आहे. याच ठिकाणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचेही घर आहे. सध्या मलिक अटेकत आहेत. दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
गृह मंत्रालयाच्या आदेशाने फेब्रुवारीत एनआयएने दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीच्या बेकायदेशीर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे. खंडणी वसुलीतून मिळणाऱ्या पैशांचा वापर देशविरोधी कारवायांत होत असल्याचा आरोप आहे. एनआयएने याप्रकरणात यूएपीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्यांचे कनेक्शन 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दहशतवादी दाऊद इब्राहिमशी असल्याचे सांगण्यात येते आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या जमीन खरेदी प्रकरणात अटकेत आहेत. त्यांना ईडीने अटक केली आहे. दहशतवादासाठी फंडिंगचा आरोप त्यांच्याविरोधात तपास यंत्रणा करीत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप करीत आहे, यात अनिल परब यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणाकोणापर्यंत यंत्रणा पोहचणार, हे गूढ आहे.