वडिलांनी दरवाजा ठोठावला, पण आतून प्रतिसाद येत नव्हता, मग पोलिसांना बोलावून दरवाजा उघडला तर…

वडिल नेहमीप्रमाणे घरी आले आणि दरवाजा ठोठावला. पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. अखेर त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिलं तर धक्काच बसला.

वडिलांनी दरवाजा ठोठावला, पण आतून प्रतिसाद येत नव्हता, मग पोलिसांना बोलावून दरवाजा उघडला तर...
विक्रोळीत आई आणि मुलाचा मृतदेह सापडलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 4:59 PM

मुंबई : विक्रोळी येथील कन्नमवार नगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील गुलमोहर सोसायटीत एका घरामध्ये आई आणि तरुण मुलाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. उमा संजय तावडे असे आईचे तर अभिषेक संजय तावडे असे मुलाचे नाव आहे. मुलाने आत्महत्या केली होती, मात्र आईचा मृत्यू नेमका कसा झाला ते समजू शकले नाही. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. विक्रोळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. यामध्ये काही संशयास्पद असे काहीच आढळले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आई आणि मुलामध्ये रोज भांडण व्हायचे

मुंबईतील विक्रोळी परिसरातील कन्नमवार येथील गुलमोहर सोसायटीमध्ये अभिषेक हा आई-वडिलांसोबत वास्तव्यास होता. त्याचे वडील लोअर परळ येथे कामाला होते. तर आई एका दवाखान्यात काम करते. आई आणि मुलामध्ये रोज भांडणं होत असे. त्यामुळे या भांडणाला कंटाळून वडील कार्यालयातच थांबायचे. ते आठवड्यातून फक्त दर रविवारी घरी जायचे.

वडील घरी आल्यानंतर घटना उघड

नेहमीप्रमाणे वडील रविवारी घरी आले आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे वडिलांनी मुलाला आणि पत्नीला आवाज दिला. मात्र तरीही आतून कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वडिलांनी शेजारच्यांच्या मदतीने पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. घटनेचं गांभीर्य पाहता पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडला. यानंतर घरातील दृश्य पाहून वडिलांना धक्काच बसला. घरात उमा या हॉलमध्ये मृतावस्थेत आढळल्या तर अभिषेक बेडरूममध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.

हे सुद्धा वाचा

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.