Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणखी एक डेड बॉडी!

मुंब्रा रेतीबंदर परिसरात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, या प्रकरणी पोलीस घटनास्थळी अधिक तपास करत आहेत (Dead body mumbra creek)

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणखी एक डेड बॉडी!
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 11:42 AM

ठाणे : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात ज्या ठिकाणी आढळून आला होता, त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळून आला आहे. मुंब्य्रातील खाडी किनारी भागात हा मृतदेह सापडला. मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. (Dead body found near mumbra creek where Mansukh Hiren was found dead)

संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. ही आत्महत्या आहे, हत्या, घातपात की अपघात याचा तपास पोलीस करत आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण ताजं असतानाच मुंबईतील नाल्यात आणखी एक मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडीओ :

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मनसुख हिरेन प्रकरणाचा एटीएसकडून तपास

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) काढून राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या एनआयए केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत आहे.

विक्रोळीतही मृतदेह सापडला

विक्रोळीतील टागोरनगर भागात असलेल्या नाल्यात 16 मार्चला मृतदेह सापडला होता. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. मृतदेह कोणाचा आहे, तो तिथे कसा आला, याचा शोध पोलिसांनी घेतला.

संबंधित बातम्या :

मनसुख हिरेन यांचा मृतदेह भरतीवेळी टाकला, ओहोटीमुळे सापडला? नाट्य रुपांतरणात काय काय समोर?

विक्रोळीतील नाल्यात मृतदेह सापडला, ओळख पटवण्याचे प्रयत्न

(Dead body found near mumbra creek where Mansukh Hiren was found dead)

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.