19 वर्षीय युट्युबरचा मृत्यू , घरात मृतावस्थेत आढळली
तिच्या शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. तर घरात पंख्याला लटकत्या अवस्थेत ती सापडली. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा सापडल्या आहेत.
गुवाहटी : एका 19 वर्षीय युट्युबर आसामच्या गुवाहटीच्या तिच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. तिच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा आढळल्याने पोलिसांनी तिच्या पतीला तातडीने अटक केली आहे. प्रियोलिना हीचे स्नॅगी व्लॉग्स नावाचे युट्युब चॅनल आहे. पोलीसांनी तिचा पती पंकज नाथ ( वय 30 ) याला अटक केली आहे.
एका १९ वर्षीय युट्युबर प्रियोलिना हीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी पंख्याला लटकत्या अवस्थेत सापडला आहे. प्रियोलिना हीचे स्नॅगी व्लॉग्स नावाचे युट्युब चॅनल आहे. तिच्या गुवाहटीतील घरी ती मृतावस्थेत सापडला असला तरी तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने चांदमरी पोलीसांनी तिचा पती पंकज नाथ ( वय 30 ) याला अटक केली आहे.
प्रियोलिना हीचे पंकज याच्याशी अवघ्या तीनच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. प्रियोलिना हीच्या नातेवाईकांनी पंकज याच्यावर आरोप केल्याने त्याला पोलीसांनी अटक केली आहे. तिच्या शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. तर घरात पंख्याला लटकत्या अवस्थेत ती सापडली. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा सापडल्या आहेत.
पोलीसांनी तिच्या पतीला ( पंकज ) अटक केली आहे. पंकजने दावा केला आहे की तिने आत्महत्या केली आहे. तरी पोलीस या प्रकरणाचा सर्व एंगलने तपास करीत आहेत. आम्ही त्याला अटक करून कोर्टात हजर केले. आणि कोर्टाकडून त्याच्या रिमाडची मागणी केली आहे.
प्रियोलिनाच्या एका फ्रेंडने सांगितले की ती खूपच फन लविंग गर्ल होती. तिने लग्न केव्हा केले हे कळलेच नाही, आम्ही टीव्हीवर तिच्या मृत्यूची बातमी पाहीली तर आम्हाला धक्काच बसला. मी तिला काही दिवसांपूर्वी भेटलो होतो. तेव्हा ती किती आनंदात वाटत होती. ती असे काही करेल हे पटतच नाही. आम्ही एकत्र अनेक व्हिडीओ बनवले होते. आम्ही तिचे चांगले मित्र असून तिच्या लग्नाविषयी आम्हाला माहिती नाही. ती नेहमी आम्हाला सांगायची ती एका भाड्याच्या घरात एकटीच रहाते असे तिच्या एका मित्राने एबीपी न्यूजला सांगितले आहे.