Deepali Chavan Suicide | शिवकुमारला ताब्यात द्या, महिला आक्रमक, पोलिसांनी आरोपीला साखळी करुन कोर्टात नेलं
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ शिवकुमारच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली (Deepali Chavan protest Amravati Shivkumar)
अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर (RFO Deepali Chavan Suicide) शेकडो महिलांनी पोलिस ठाण्यात धडक दिली. आरोपी शिवकुमारला ताब्यात देण्याची मागणी यावेळी संतप्त महिलांनी केली. महिला आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी मानवी साखळी करून आरोपीला कोर्टात हजर केले. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवकुमारला धारणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Deepali Chavan Suicide women protest at Amravati against Accuse Vinod Shivkumar)
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यांनी लिहिलेल्या सुसाईट नोटमधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
डीएफओ विनोद शिवकुमारला नागपुरात बेड्या
डीएफओ विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून दीपाली यांनी आत्महत्या केल्याने धारणी पोलिसांनी त्याला नागपुरातून अटक केली. त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आज शेकडो महिलांनी पोलीस ठाण्यात धडक दिली. आरोपी शिवकुमारला ताब्यात देण्याची मागणी महिलांनी केली.
आरोपीला कोर्टात नेत असताना महिला मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्या होत्या. शिवकुमारचा निषेध व्यक्त करत महिलांनी प्रचंड घोषणाबाजी केली. तसंच त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचीही मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी मानवी साखळी करुन आरोपीला कोर्टात हजर करावं लागलं.
शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
दरम्यान दीपाली चव्हाण यांच्या आईने आरोपी शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. विनोद शिवकुमार याचं निलंबन करुन श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा दीपाली चव्हाण यांच्यावर मोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी चव्हाण कुटुंबाचे सांत्वन करुन श्रद्धांजली वाहिली.
दीपाली चव्हाण यांची सुसाईड नोट
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. यात वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. (Deepali Chavan Suicide women protest at Amravati against Accuse Vinod Shivkumar)
दरम्यान, RFO दीपाली चव्हाण आणि डीसीएफ विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरुन जे वार्तालाप झालं त्याची कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये संबंधित अधिकारी आपल्याच वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत कशाप्रकारे एकेरी भाषेत बोलतात. बोलताना मान मर्यादा आणि महिलांशी कसं बोलायचं याचं सुद्धा भान त्यांना उरलेलं दिसत नाही. ही ऑडिओ क्लीप तुम्ही ऐकू शकता
संबंधित बातम्या :
साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी
ना भान, ना बोलण्याची तमा, कथित अधिकाऱ्यासोबत दीपाली चव्हाण यांचं संभाषण
(Deepali Chavan Suicide women protest at Amravati against Accuse Vinod Shivkumar)