हरणांच्या जिवावर कोण उठलं? हरण तस्करी टोळी हाती लागणार? मालेगावत मोठी कारवाई

| Updated on: Jan 13, 2023 | 10:54 AM

मालेगावमधील गुलशनाबाद भागात उपविभागीय पोलिस अधिकारी तेगबीरसिंह संधु यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये एकाला अटक करत हरणांचे मांस यांसह हत्यारे जप्त केली आहे.

हरणांच्या जिवावर कोण उठलं? हरण तस्करी टोळी हाती लागणार? मालेगावत मोठी कारवाई
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, माळेगाव ( नाशिक ) : गेल्या काही दिवसांपासून हरणांची संख्या कमी-कमी होत चालली आहे. त्याबाबत वनविभागाकडून विविध कयास बांधले जात होते. मात्र, याबाबत ठोस अशी माहिती मिळत नव्हती, त्यामुळे कारवाई कुणावर करायची असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात असे. नाशिकच्या विविध भागात हरणांचा मोठा वावर आहे, ठिकठिकाणी त्यांची कळप नागरिकांना बघायला मिळतो. त्यातच शेतीचे नुकसान होत असल्याने हरणांना शेतकरी पळवून लावत असतील असा अंदाज वनविभागाकडून लावला गेला होता. अनेकदा वाहनांच्या धडकेत हरणांचा मृत्यू झाला आहे. तरीही हरणांच्या संख्येत घट विलक्षण होत असल्याचं निदर्शनास येत होते. त्यामुळे हरणांची तस्करी केली जात असल्याचा संशय वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आला होता. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तस्करांच्या मागावर होतेच, आणि त्याच पार्श्वभूमीवर मालेगावात मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

मालेगावमधील गुलशनाबाद भागात उपविभागीय पोलिस अधिकारी तेगबीरसिंह संधु यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये एकाला अटक करत हरणांचे मास यांसह हत्यारे जप्त केली आहे.

सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये मालेगावमधील शरजील अंजुम अहमद याला अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

शरजील वर वन्य प्राणी संरक्षण कायदानुसार उल्लंघन आणि संरक्षित प्राण्यांची शिकार करणे यानुसार गुन्हा दाखल केल्यानं खळबळ उडाली आहे.

अवैध शिकार करून हरणाच्या मांस आणि कातडीची विक्री केली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती त्यावरून ही मोठी कारवाई करण्यात आली असून तपासात तस्करी रॅकेटची उकल होते का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.