Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV : बहिणीला छेडलं म्हणून भाऊ मदतीसाठी धावला! पण नराधमांपुढे तमाशा पाहत राहिले लोक

मनोज घरी परतत होता, पण वाटेतच त्याला घेरलं.. हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

CCTV : बहिणीला छेडलं म्हणून भाऊ मदतीसाठी धावला! पण नराधमांपुढे तमाशा पाहत राहिले लोक
मृत मनोज नेगीImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 3:50 PM

दिल्ली : राजधानी दिल्लीतील पटेल नगर (Delhi Crime) इथं थरकाप उडवणारं एक हत्याकांड घडलं. बहिणीची छेड काढणाऱ्यांना विरोध करणाऱ्या भावाला दोघा नराधमांनी भोसकलं आणि त्याची हत्या केली. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Video) कैद झालीय. या हत्याकांड प्रकरणातील दोन्ही आरोपींना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) बेड्या ठोकल्यात. दोघेही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

17 वर्षीय मनोज नेगी हा आयटीआय पूसा इथं शिकत होता. आयटीआयचा वर्ग संपल्यानंतर शुक्रवारी तो घरी परतत होता. त्यावेळी त्यांना नराधमांनी घेरलं आणि त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात मनोजला गंभीर जखम झाली.

मनोजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मनोजला भोसकल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता.

हे सुद्धा वाचा

मनोजचे वडील चंदन नेगी यांनी आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गंभीर पावलं उचलत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपींची कसून चौकशी केली जातेय. ज्या हत्याराने आरोपींनी मनोजला भोसकलं, ते हत्यारही जप्त करण्यात आलंय.

पोलीस सध्या या थरारक घटनेचा तपास करत आहेत. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून पुढील कारवाई केली जात आहे. सीसीटीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

नातलगांनी केलेल्या आरोपांनुसार, ही घटना जेव्हा घडली, तेव्हा लोकांनी काहीच मदत केली नाही. लोक तमाशा बघत राहिल्यामुळे मुलाला जीव गमावावा लागला, असा आरोप मृत मनोजच्या वडिलांनी केलाय.

ही घटना झाल्यानंतर लोकांना मनोजला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मनोज याला रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. वेळीच जर लोकांनी त्याला रुग्णालयात नेलं असतं, तर आज तो जिवंत असता, असं मृत मनोजच्या वडिलांनी म्हटलंय.

चंदन नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज याने बहिणीची छेड काढणाऱ्यांना इशारा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून मनोजच्या बहिणीवर काही नराधम डोळा ठेवून होते. तिची छेडछाड काढत होते. हे पाहून मनोजने नराधमांचं घर गाठलं होतं आणि त्यांना थेट इशारा दिला होता.

यावेळी मनोज आणि हल्लेखोरांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. मनोजला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आलेली होती. याप्रकरणी पोलिसांनाही कळवण्यात आलेलं. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. अखेर मनोजची हत्या करण्यात आल्यानं आता खळबळ उडाली आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.