CCTV : बस चालकाने डावीकडे पाहिलंच नाही, तरुणीला चिरडताना थरार कॅमेऱ्यात कैद

रस्ता ओलांडताना ही चूक करणं पडू शकतं महागात! अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज काळजाचा ठोका चुकवणारं

CCTV : बस चालकाने डावीकडे पाहिलंच नाही, तरुणीला चिरडताना थरार कॅमेऱ्यात कैद
दुर्दैवी अपघातImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 12:30 PM

दिल्ली : रस्ता ओलांडत असताना एका बसने तरुणीला (Road Accident Death) चिरडलं. यात तरुणीचा जागीच जीव गेला. काळजाचा थरकाप उडवणारा हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Accident CCTV Video) कैद झालाय. नवी दिल्लीच्या (New Delhi Accident News) करोल बाग परिसरात ही घटना घडली.

फैज रोड येथे पायी चालत जाणाऱ्या 27 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला. या तरुणीला धडक दिल्यानंतरही निर्दयी चालकाने गाडी थांबवली नाही. तिला तसंच फरफटत तो पुढे घेऊन गेला. त्यामुळे या घटनेची दाहकता अधिक वाढली.

हे सुद्धा वाचा

रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत या मुलीचा मृतदेह पाहून सगळेच थबकले होते. या अपघातप्रकरणी पोलिसांनी आता पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या 27 वर्षीय तरुणीचं नाव सपना असल्याची माहिती समोर आली आहे. ती गाझियाबादमधील रामेश्वर पार्कमध्ये पाहत होते. तिचे वडील खाडी बाओली परिसरात हातगाडीवर संसार चालवतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सपना ही एका खासगी कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. ती घरातून ऑफिसला जात असताना काळानं तिच्यावर घाला घातला. रस्ता क्रॉस करतेवेळी बसने तिला चिरडलं.

पाहा सीसीटीव्ही व्हिडीओ :

सपनाला ज्या बसने चिरडलं, ती बस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही बस दिल्ली-जयपूर-अजमेर या मार्गावर धावते. बसचा चालक आणि वाहक यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथकंही तैनात केली आहेत.

बस थांबलेली असल्यामुळे सपना डाव्या बाजूने बसच्या समोर आली. ती बसच्या समोरुन रस्ता क्रॉस करणार होती. पण चालकाने डाव्या बाजूला आणि समोर न पाहताच बस पुढे घेतली आणि अनर्थ घडला.

सपनाला बसचा जबर धक्का बसला आणि ती रस्त्यावर कोसळली. त्यानंतर बसच्या चाकाखाली चिरडली गेल्यानं प्रचंड रक्तस्त्राव होऊन तिचा जागीच जीव गेला.

या अपघातामुळे थांबलेल्या बस समोरुन रस्ता क्रॉस करताना काळजी घेण्याची गरजही आता व्यक्त केली जाते आहे. त्याच प्रमाणे बसच्या समोरुन रस्ता क्रॉस करणं जीवावर बेतू शकतं. अशावेळी अधिक खबरदारी बाळगण्याची गरज व्यक्त केली जातेय. मात्र ऐन तारुण्यात मुलीला अपघातात गमावल्यामुळे सपनाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.