Crime News : हॉटेलमध्ये मृतदेह लटकतोय कोणालाचं थांगपत्ता नाही, शेवटी…

| Updated on: Feb 24, 2023 | 8:12 AM

प्राथमिक चौकशी केली असता, ती तरुणी दोन दिवसांपासून घरातून गायब होती. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करणार आहे.

Crime News : हॉटेलमध्ये मृतदेह लटकतोय कोणालाचं थांगपत्ता नाही, शेवटी...
buldhana
Image Credit source: Google
Follow us on

दिल्ली : राजधानी दिल्लीत (delhi) एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (girl Suicide) केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ऑनलाईन बुक केलेल्या ओयोच्या (oyo hotel) रुममध्ये तिने आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. तिचा मृतदेह हॉटेलमध्ये लटकताना आढळून आल्याने हॉटेल कर्मचारी सुध्दा हादरले आहेत. या घटनेची माहिती हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत तरुणीने स्वत: आत्महत्या केली असल्याचे सांगितले. हॉटेलमध्ये सापडलेल्या काही संशयास्पद वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याचबरोबर पुढील तपास करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले,

घरातून दोन दिवस बेपत्ता होती

तरुणी दोन दिवस घरातून बेपत्ता होती. तरुणीचा मृतदेह दिल्लीतील उत्तम नगरमधील एका ओयोच्या हॉटेलरुममध्ये सापडला आहे. पोलिसांनी हे प्रेम प्रकरण असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पोलिस म्हणतात…

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील उत्तम नगर मधील ओयो हॉटेलच्या एका रुममध्ये तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. प्राथमिक चौकशी केली असता, ती तरुणी दोन दिवसांपासून घरातून गायब होती. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करणार आहे.

हे सुद्धा वाचा

आत्महत्येचं कारण माहित नाही

पोलिस या प्रकरणाची विविध पद्धतीने चौकशी करीत आहे. तरुणीचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल असं देखील सांगितलं आहे. पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचारी आणि मालक यांची चौकशी केली. त्याचबरोबर हॉटेलमधील सीसीटिव्ही सुध्दा तपासून पाहिला आहे. परंतु या प्रकरणामध्ये अद्याप पोलिसांच्या महत्त्वाची माहिती मिळालेली नाही. परंतु आनंद नगर परिसरात खळबळ माजली आहे.