प्रियकर-प्रेयसी हॉटेल रुममध्ये, तरुणीला आलेल्या एका फोनमुळे बॉयफ्रेण्डकडून हत्या

शिवम आणि सोनिया हॉटेलच्या रुममध्ये होते. त्यावेळी सोनियाचा फोन सारखा वाजत होता. शिवमने पाहिलं, तर उत्कर्ष नावाच्या तरुणाचा तिला सतत फोन येत होता. या कारणावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला

प्रियकर-प्रेयसी हॉटेल रुममध्ये, तरुणीला आलेल्या एका फोनमुळे बॉयफ्रेण्डकडून हत्या
दिल्लीतील हॉटेलमध्ये तरुणीची हत्याImage Credit source: आज तक
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 11:29 AM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील हॉटेलमध्ये (Hotel) झालेल्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दिल्ली पोलिसांनी शिवम चौहान नावाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दिल्लीतील दक्षिण पश्चिम भागात महिपालपूर परिसरातील एका हॉटेलच्या रुम नंबर 203 मध्ये तरुणीचा मृतदेह (Delhi Crime) आढळून आला होता. हत्या प्रकरणात अटक झालेला तरुण हा मयत सोनियाचा बॉयफ्रेण्ड असल्याची माहिती आहे. सोनिया आणि शिवम हे दोघं गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र काही काळापासून सोनियाची एका तरुणासोबत झालेली मैत्री शिवमला खुपत होती. याच रागातून त्याने गर्लफ्रेण्डची हत्या (Girlfriend Murder) केल्याचा आरोप आहे. 27 फेब्रुवारी रोजी व्हीके दक्षिण पोलिसांना महिपालपूर येथील लक रेसिडेन्सी हॉटेलमध्ये सोनियाचा मृतदेह सापडला होता.

नेमकं काय घडलं?

शिवम आणि सोनिया हॉटेलच्या रुममध्ये होते. त्यावेळी सोनियाचा फोन सारखा वाजत होता. शिवमने पाहिलं, तर उत्कर्ष नावाच्या तरुणाचा तिला सतत फोन येत होता. या कारणावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. वाद इतका विकोपाला गेला, की शिवमने तिचं डोकं लादीवर आपटलं. त्यामुळे रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला.

काय आहे प्रकरण?

विमानतळासमोर महिपालपूर येथील एका हॉटेलच्या खोली क्रमांक 203 मध्ये 25 वर्षीय सोनियाचा मृतदेह आढळला होता. ती 25 फेब्रुवारीला प्रियकरासोबत हॉटेलमध्ये आली होती. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रुम सर्व्हिसने खोली उघडून पाहिली असता तिचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला.

सोनियाचा प्रियकर खोलीतून फरार झाला होता. या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला. यावेळी खोलीत दारुच्या बाटल्याही सापडल्या होत्या.

कुटुंबाच्या संमतीने लग्न ठरलेलं

सोनियाचे कुटुंबीय किशनगड येथील रहिवासी आहेत. पाच भावंडांमध्ये ती सगळ्यात धाकटी होती. गेल्या चार वर्षांपालून ती शिवम चौधरी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंधात होती. दोघंही लग्न करणार होते. कुटुंबाच्या संमतीने ती बॉयफ्रेण्डसोबत एक-दोन दिवस फिरायला बाहेरही जात असे.

25 फेब्रुवारीलाही ती घरी सांगून शिवमसोबत बाहेर गेली होती. तिच्यासोबत 62 हजार रुपये असल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. तिचा फोन लागत नव्हता, मात्र ती शिवमसोबत सुखरुप असेल, असा तिच्या कुटुंबीयांचा समज होता. 27 फेब्रुवारीला पोलिसांचा फोन आला, तेव्हा कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. ती लवकर लग्न करण्यासाठी बॉयफ्रेण्डकडे तगादा लावायची, मात्र तो चालढकल करायचा. याच कारणावरुन त्याने तिचा जीव घेतल्याचा संशय कुटुंबाने व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या :

हॉटेलच्या खोलीत घुसून तरुणीची हत्या, चार वर्षांपासून रुम बुक करणारा मित्र संशयाच्या भोवऱ्यात

पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले, पतीचं टोकाचं पाऊल

मध्यरात्री भररस्त्यात हल्ला, 40 वर्षीय व्यक्तीच्या खुनाने परभणीत खळबळ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.