इकडे ये, मस्त फिरूया… स्वित्झर्लंडहून गर्लफ्रेंडला भारतात बोलावलं; पण डोक्यात शिजत होता वेगळाच प्लान

स्वित्झर्लंडची नागरिक असलेली ती महिला बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून भारतात फिरायला आली होती. मात्र इथे आल्यावर तिच्यासोबत जे घडलं त्याने सगळेच हादरले.

इकडे ये, मस्त फिरूया... स्वित्झर्लंडहून गर्लफ्रेंडला भारतात बोलावलं; पण डोक्यात शिजत होता वेगळाच प्लान
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 2:20 PM

नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : संशय… संशयाचा (suspision) किडा एकदा का डोक्यात वळवळायला लागला की माणसाचं काही खरं नाही! आणि प्रेमात जर का संशय घुसला तर मग अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अशाच संशयातून एका व्यक्तीने अशी कृती केली ज्यामुळे फक्त त्याचं आयुष्य बरबाद झालं नाही तर एका महिलेचं आयुष्यचं संपून गेलं.

ही घटना आहे राजधानी दिल्लीमधली. दिल्लीतील तिलकनगर भागात शुक्रवारी एका विदेशी महिलेचा मृतदेह (murder news) सापडल्यामुळे एकच खळबळ माजली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तिचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. तपासाअंती एका आरोपीला अटक तर करण्यात आली पण तो आरोपी कोण हे समोर आल्यावर सर्वजण हादरले. त्या महिलेच्या बॉयफ्रेंडनेच तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. मूळची स्वित्झर्लंडची असलेली ही (मृत) महिला तिच्या (आरोपी) बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून भारतात फिरण्यासाठी आली होती. मात्र तीच तिची अखेरची ट्रीप ठरली.

भारतात फिरायला आली पण …

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी टिळक नगर येथील एमसीडी शाळेसमोर एका परदेशी महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचे हात-पाय साखळदंडाने बांधून कुलूप लावले होते. या अवस्थेत महिलेचा मृतदेह ज्यानेही पाहिला तो घाबरलाच. या मृतदेहामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. परदेशी महिलेच्या मृतदेहाबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. या हत्येसंदर्भात तपास सुरू केल्यावर पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली असता त्यांना आरोपीचा सुगावा लागला.

सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी गुरप्रीतची ओळख पटली, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस सध्या गुरप्रीतची चौकशी करत आहेत. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला स्वित्झर्लंडची नागरिक असून ती तेथे राहत होती. अटक करण्यात आलेला आरोपी , गुरप्रीत अनेकदा त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जायचा. मात्र तिचे आणखी कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा आरोपीला संशय आला. आणि त्याच संशयातून त्याने तिची हत्या करण्याचा भयानक कट रचला.

भारत फिरायला येण्याच्या बहाण्याने आरोपीने त्याच्या गर्लफ्रेंडला स्वित्झर्लंडहून बोलावले आणि त्यानंतर तिची हत्या केली. 11ऑक्टोबर रोजी ती महिला स्वित्झर्लंडहून भारतात आली आणि 16 ऑक्टोबरला आरोपीने तिचा खून केला. आरोपी गुरप्रीतने एका महिलेच्या नावे जुनी कार खरेदी केली होती. यानंतर हॉटेल कर्मचाऱ्याच्या मदतीने त्याचा आयडी पासवर्ड काढण्यात आला. गुरप्रीतने या आयडी पासवर्डचा वापर करून कार खरेदी केली होती आणि हत्येनंतर महिलेचा मृतदेह परिसरात फेकून देऊन तो पळून गेला. सध्या पोलीस आरोपी गुरप्रीतची चौकशी करत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.