Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिव्ह इन संबंधातून मूल, तरी पहिल्या नवऱ्याला घटस्फोटास नकार, तरुणाकडून विवाहित प्रेयसीची हत्या

आरोपी शिवा कुमारने आधी आपली लिव्ह इन पार्टनर ज्योतीची हत्या केली. त्यानंतर तो ज्योतीचा पती सुनीलचाही काटा काढण्याच्या तयारीत होता (Delhi Live in Partner Girlfriend)

लिव्ह इन संबंधातून मूल, तरी पहिल्या नवऱ्याला घटस्फोटास नकार, तरुणाकडून विवाहित प्रेयसीची हत्या
Partially Burnt Bodies Satara
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 12:46 PM

नवी दिल्ली : पहिल्या नवऱ्याला सोडून लग्न करण्यास नकार दिल्याने युवकाने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या विवाहित प्रेयसीची हत्या केली. राजधानी दिल्लीतील मंगोलपुरी भागात हा धक्कादायक प्रकार घडला. हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे. लिव्ह इन संबंधातून या युगुलाला मूलही झालं होतं. विशेष म्हणजे प्रेयसीच्या हत्येनंतर आरोपी तिच्या पतीचाही काटा काढण्याच्या तयारीत होता. (Delhi Crime News Man Killed Live in Partner Girlfriend for Refusing to marry)

संशयास्पद फिरणाऱ्या युवकाची धरपकड

आरोपी शिवा कुमारने आधी आपली लिव्ह इन पार्टनर ज्योतीची हत्या केली. त्यानंतर तो ज्योतीचा पती सुनीलचाही काटा काढण्याच्या तयारीत होता. सुनीलच्या शोधात तो त्याच्या घराच्या परिसरात फिरत होता. दिल्लीतील बवाना पोलिसांनी शिवा कुमारला शुक्रवारी अटक केली. संशयास्पदरित्या फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले होते. पोलिसांना या तरुणाकडे बंदूक सापडली होती. चौकशीदरम्यान या थरारक घटनेचा उलगडा झाला.

पहिल्या नवऱ्याला घटस्फोट देण्यास नकार

शिवा आणि ज्योती यांची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्री आणि प्रेमात झालं. त्यानंतर दोघं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. दरम्यानच्या काळात त्यांना अपत्यही झाले. मात्र पती सुनीलपासून घटस्फोट न झाल्याचं कारण सांगत ज्योती लग्नास नकार देत होती. ही गोष्टी शिवाला वारंवार खटकत असे. तर तिचा पती सुनीलही घटस्फोटाची कागदपत्र स्वाक्षरी करण्यास तयार नव्हता. त्यामुळे शिवाच्या मनातील खदखद वाढत चालली होती.

मद्यपानानंतर प्रेयसीची हत्या

गुरुवारी रात्री शिवाने ज्योतीसोबत मद्यपान केलं. त्यानंतर दारुच्या बाटलीनेच वार करुन तिची हत्या केली. त्यानंतर सुनीलचाही जीव घेण्यासाठी तो घटनास्थळावरुन पसार झाला. सुनीलला मारण्यासाठी त्याने बंदूकही सोबत ठेवली होती. परंतु त्याआधीच पोलिसांनी त्याला पकडलं.

संबंधित बातम्या :

मैत्रिणीशी जवळीक खटकली, अमेरिकेत 32 वर्षीय भारतीय इंजिनिअरची हत्या

पत्नीशी पटेना, नवऱ्याने फेसबुकवर तिचाच अश्लील व्हिडीओ टाकला

(Delhi Crime News Man Killed Live in Partner Girlfriend for Refusing to marry)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.