आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या आईने खाल्ल्या 70 बीपीच्या गोळ्या, तिचा त्रास पाहून मुलाने दाबला गळा, नंतर मुलाने चिठ्ठी लिहून…

| Updated on: Mar 24, 2023 | 11:54 AM

द्वारकाचे डिसीपी हर्षवर्धन यांनी सांगितलं की, द्वारका सेक्टर-22 मध्ये एका महिलेचा मृतदेह अंथरुनाथ मिळाला. त्या महिलेच्या गळ्यावरती काही निशान होते, त्याचबरोबर महिलेच्या नाकातून देखील रक्त आलं होतं.

आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या आईने खाल्ल्या 70 बीपीच्या गोळ्या, तिचा त्रास पाहून मुलाने दाबला गळा, नंतर मुलाने चिठ्ठी लिहून...
police
Image Credit source: socialmedia
Follow us on

दिल्ली : दिल्लीत (Delhi) क्राईमची (Crime story) एक अशी घटना घडली आहे. त्यामुळे पोलिस आणि नातेवाईक सुध्दा शॉक झाले आहेत. ज्यावेळी आत्महत्या झाल्याचं पोलिसांना समजलं. त्यावेळी भयावह चिट्टी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. मुलाने आपल्या आईचा गळा दाबला आहे. त्यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या (suicide note) करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाचं वय ३० वर्षे असून आईचं वय ६५ होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला काल ताब्यात घेतलं आहे. घरची आर्थिकस्थिती योग्य नसल्यामुळं त्यामुळं मुलाने अशा पद्धतीचं कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस आरोपींची सगळ्या पद्धतीनं चौकशी करीत आहेत.

भीतींवरती चिटकवली होती चिठ्ठी

द्वारकाचे डिसीपी हर्षवर्धन यांनी सांगितलं की, द्वारका सेक्टर-22 मध्ये एका महिलेचा मृतदेह अंथरुनाथ मिळाला. त्या महिलेच्या गळ्यावरती काही निशान होते, त्याचबरोबर महिलेच्या नाकातून देखील रक्त आलं होतं. एका खोलीत गोळीची सात पॉकेट होती. त्याचबरोबर तिथं भिंतीवर सुसाईड नोट चिटकवलं होतं. महिलेने लिहिलेल्या एका चिठ्ठीमुळे सत्य उजेडात आलं आहे. महिलेनं लिहिलं आहे की, मी आर्थिक गोष्टीमुळे तंग आहे, त्यामुळे आत्महत्या केली असल्याचं महिलेने चिठ्ठीत लिहिलं आहे. ज्यावेळी पोलिसांनी मुलाची चौकशी केली, त्यावेळी सोमवारी रात्री त्याच्या आईन बीपीच्या ७० गोळ्या खाल्या, त्यानंतर ती मेली नव्हती. ती फक्त अंथरुनावरती तडफडत होती.

मग दाबला आईचा गळा…

आईची परिस्थिती पाहवत नसल्यामुळे मुलाने आपल्या आईचा गळा दाबला, त्यानंतर त्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहीली. त्यानंतर त्याने सुध्दा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करीत करण्यास तो असमर्थ ठरला. पोलिसांनी मुलांवरती आईची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी ही माहिती सांगितली, दोघांची एकाचवेळी आत्महत्या करण्याची योजना तयार केली होती.

हे सुद्धा वाचा