Delhi Murder | लग्नातील जल्लोष स्मशानशांततेत बदलला, नातेवाईकांमध्ये वाद, एकाची निर्घृण हत्या

नवी दिल्ली : दिल्लीतील अलीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पल्ला गावात (Delhi Crime News) लग्न समारंभात असलेल जल्लोषाचे वातावरण स्मशान शांततेत बदलले. लग्न स्थळापासून काही अंतरावर एका व्यक्तीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पार्वती चौकातील शिववाटिका भागात ही घटना घडली. संजय नावाच्या व्यक्तीने सुनील चौहान यांची गोळ्या झाडून हत्या केली. […]

Delhi Murder | लग्नातील जल्लोष स्मशानशांततेत बदलला, नातेवाईकांमध्ये वाद, एकाची निर्घृण हत्या
कोल्हापूर जिल्ह्यामधील शाहूवाडीत पत्नीकडून पतीची हत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 11:46 AM

नवी दिल्ली : दिल्लीतील अलीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पल्ला गावात (Delhi Crime News) लग्न समारंभात असलेल जल्लोषाचे वातावरण स्मशान शांततेत बदलले. लग्न स्थळापासून काही अंतरावर एका व्यक्तीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पार्वती चौकातील शिववाटिका भागात ही घटना घडली. संजय नावाच्या व्यक्तीने सुनील चौहान यांची गोळ्या झाडून हत्या केली. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, 7 महिन्यांपूर्वीही आरोपी आणि मृत व्यक्ती यांच्यात भांडण झाले होते, परंतु एकाच कुटुंबातील सदस्य असल्याने समेट घडवून आणण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

रविवारी रात्री पल्ला गावात लग्न समारंभ होता, त्यावेळी विवाह स्थळापासून काही अंतरावर असलेल्या शिव गार्डनमध्ये आरोपी संजय पिस्तुल हातात घेऊन नाचत होता. यादरम्यान संजयने सुनील चौहानवर काही भाष्य केले आणि दोघांमध्ये भांडणाला तोंड फुटले.

छातीत गोळी झाडली

वादानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत केले. मात्र संजयने संतापाच्या भरात शिव गार्डनपासून काही अंतरावर जाऊन सुनील चौहान यांच्या छातीत गोळी झाडली. यानंतर सुनील चौहान यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा

या हत्येबाबत डीसीपी विजेंद्र यादव म्हणाले की, हत्येचा आरोपी संजयला अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अलीपूर पोलीस ठाण्याचे पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत. आम्ही मृताच्या नातेवाईकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु कौटुंबिक कारण असल्यामुळे त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

अनेक महिन्यांपासून वाद

संजय आणि सुनील चौहान यांच्यात अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता आणि रविवारी रात्री लग्न समारंभात काही कारणावरून झालेल्या वादातून संजयने सुनील चौहानची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अशा परिस्थितीत, संजय आणि सुनील चौहान यांच्यात कोणत्या कारणावरुन वाद झाला? संजयकडे असलेले शस्त्र कोणी पुरवले? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

सध्या अलीपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सुनील चौहान यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी बाबू जगजीवन राम रुग्णालयात पाठवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.