JNU VIDEO | Non Veg जेवणावरुन ‘जेएनयू’मध्ये राडा, दोन विद्यार्थी संघटना भिडल्या, सहा जण जखमी
जेएनयू कॅम्पसमध्ये नॉन व्हेज जेवण आणि रामनवमीच्या पूजेवरुन वाद सुरु झाल्यानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत दिल्ली पोलिस तैनात होते. रविवारी जेएनयू कॅम्पसमध्ये डाव्या संघटना आणि अभाविपशी संलग्न विद्यार्थी यांच्यात दोन वेळा संघर्षाची ठिणगी उडाली
नवी दिल्ली : नॉन व्हेज जेवणावरुन (Non Veg) दिल्लीतील जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयाच्या (Delhi JNU Campus) कॅम्पसमध्ये रविवारी रात्री मोठा राडा झाला. चैत्र नवरात्रीनिमित्त उपवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रामनवमीच्या (Ram Navami) दिवशी हॉस्टेल मेसमध्ये मांसाहारी भोजन ठेवण्यास आक्षेप घेतला, त्यावरुन दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. या राड्यामध्ये सहा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. जेएनयू कॅम्पसमधील राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
जेएनयू कॅम्पसमध्ये नॉन व्हेज जेवण आणि रामनवमीच्या पूजेवरुन वाद सुरु झाल्यानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत दिल्ली पोलिस तैनात होते. रविवारी जेएनयू कॅम्पसमध्ये डाव्या संघटना आणि अभाविपशी संलग्न विद्यार्थी यांच्यात दोन वेळा संघर्षाची ठिणगी उडाली. दुपारी घडलेल्या घटनेनंतर पोलिस जेएनयूमध्ये पोहोचले होते, मात्र रात्री विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रात्री जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
एएनआयचे ट्वीट
Delhi | A scuffle broke out between two groups in JNU over allegedly eating non-vegetarian food
ABVP has gone on rampage in JNU as other students resisted their attempt to ban non-veg food. 50-60 people are injured, says Sarika a PhD student & former vice president of JNUSU pic.twitter.com/yED7K4OtTA
— ANI (@ANI) April 10, 2022
जेएनयूचे म्हणणे काय?
जेएनयू प्रशासनाच्या विनंतीवरुन कॅम्पसमध्ये पोलिस आले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची JNU विद्यार्थी संघटनेने JNU प्रशासनाकडे तक्रार केली आहे. जेएनयू प्रशासनाचे म्हणणे आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात असून अशा प्रकारची गैरशिस्त अजिबात खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोणाचा पेहराव, भोजन आणि श्रद्धा यावर कोणतेही बंधन असू शकत नाही. सर्व विद्यार्थी आपापल्या परीने धर्माचे पालन करतात. मेस ही विद्यार्थी समिती चालवते आणि मेनूही ठरवते.
ABVP च्या विद्यार्थ्यांनी कावेरी वसतिगृहाच्या मेस सेक्रेटरीलाही मारहाण केल्याचा आरोप डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. तर, डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी त्यांना कावेरी वसतिगृहात रामनवमीची पूजा करण्यापासून रोखल्याचा आरोप अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केला.
ABVP च्या गुंडांनी कावेरी वसतिगृहातील रहिवाशांना रात्रीच्या जेवणासाठी नॉन व्हेज खाणे थांबवले, असा आरोप जेएनयूएसयूचे माजी अध्यक्ष साई बालाजी यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत केला आहे.
पाहा व्हिडीओ
ABVP hooligans stopping Kaveri hostel residents having non Veg food for dinner.
Will JNU VC condemn ABVP hooliganism? Is it her vision to curtail students choice of food?
ABVP assualted the mess secretary. Time to stand against these vandals. The idea of India is under attack pic.twitter.com/pD978TKbyh
— N Sai Balaji | ఎన్ సాయి బాలాజీ (@nsaibalaji) April 10, 2022
संबंधित बातम्या :
JNU विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा हाणामारी, ABVP ने AISA, SFI नेत्यांवर हल्ला केल्याचा आरोप, अनेक जखमी
जेएनयूचा सिक्युरिटी गार्ड ‘ज्युली’ गाण्यावर थिरकला, लोक म्हणाले, भारतात टॅलेंटची कमी नाही!