बापरे! प्रेमप्रकरणातून बारावीतील विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या, तिघांपैकी एकाला अटक
Delhi Crime News : या मुलाचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होता, असंही तपासातून समोर आलं.
नवी दिल्ली : प्रेमप्रकरणातून (Love Affair) एका बारावीतील विद्यार्थ्याची हत्या (12th Student murder) करण्यात आली. चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. तर दोघा संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. ही खळबळजनक घटना राजधानी दिल्लीत (Delhi Crime News) घडली. पूर्वी दिल्लीतील ज्वाला नगरमध्ये घडलेल्या या घटनेनं मुलांच्या पालकांमध्येही भीती पसरली आहे. ज्वाला नगर स्मशानभूमीजवळ एका बारावीतल्या मुलाला चाकूने भोसकण्यात आलं. प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड झालं असल्याचं सांगण्यात आलं. बारावीतील मुलाला चाकूने भोसकण्यात आल्यानंतर जखमी अवस्थेतील या मुलाला रुग्णालयातही घेऊन जाण्यात आलं. रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात या मुलाला आणण्यात आल खरं. पण त्याआधीच या मुलाचा जीव गेला होता. अखेर डॉक्टरांनी या मुलाला मृत घोषित केलं. दरम्यान, पोलिसांनाही याप्रकरणाबाबत माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांचं पथकही रुग्णालयात दाखल झालं.
रस्त्याने माखलेल्या अवस्थेत मृतेदह पडून
पोलिसांचं पथक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या मुलाचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होता, असंही तपासातून समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या मुलाच्या हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेत पुढील तपास सुरुकेला. 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी युवराज नावाचा बारावीतील मुलगा प्रिन्स नावाच्या आपल्या मित्रासोबत होता. हे दोघेही जण ज्वाला नगर येथील स्मशानभूमीजवळ बसले होते. तेव्हा तिघेजण आले. त्यांची नावं सनी, लकी अशी असून तिसरा मित्र अल्पवयीन होता.
एकाला अटक, दोघांचा शोध सुरु
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान, एका मुलीचा विषय निघाला. या मुलीवर वाद सुरु झाला. या वादातून शब्दाला शब्द वाढत गेला आणि अखेर तिघांनी टोकाचं पाऊल उचलत युवराजवर चाकूने सपासप वार केले. चाकूने भोसकल्यामुळे युवराज रक्तबंबाळ झाला होता. युवराजवर हल्ला केल्यानंतर सगळे तिघे मारेकरी पळून गेले. दरम्यान, या हत्याकांडप्रकरणी एकूण तिघा आरोपींवर संशय व्यक्त करण्यात आला असून एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची सध्या कसून चौकशी करण्यात येत असून इतर दोन आरोपींचाही शोध सुरु आहे. प्रेमप्रकरणातून झालेल्या बारावीतील विद्यार्थ्याचे हत्येनं राजधानी दिल्ली हादरुन गेलीय.