Delhi Murder : दिल्ली पुन्हा हादरली! एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या

वडील, आजी आणि दोघा बहिणींच्या हत्येमागचा क्रूर चेहरा कुणाचा? मारेकरी समोर!

Delhi Murder : दिल्ली पुन्हा हादरली! एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या
धक्कादायक हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 7:56 AM

दिल्ली : एकीकडे श्रद्धा हत्याकांड (Shraddha Murder News) प्रकरणी रोज नवनवे खुलासे होते आहेत. आणि अशातच दिल्ली पुन्हा एकदा खळबळजनक हत्याकांडाच्या घटनेनं हादरलीय. दिल्लीच्या (Delhi Crime News) दक्षिण भागातील पालम (Palam) मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली. घरातील मुलानेच आपल्या वडिलांसह आजी आणि दोन बहिणींचा खून केला. ही घटना राज नगर पार्ट-2 भागात घडल्याचं उघडकीस आलंय. या भागात असलेल्या एका घरात चार मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. चाकूने भोसकून या हत्या करण्यात आल्या असल्याचं समोर आलंय. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घरातील रक्तबंबाळ अवस्थेत असलेले मृतदेह आता ताब्यात घेतलेय. हे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेत. सध्या पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून घेत पुढील तपास केला जातोय.

हे हत्याकांड घरातील मुलानेच केल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी असलेल्या मुलाला ताब्यातही घेतलंय. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे. नेमकं त्याने हे टोकाचं पाऊल का ऊचललं, याचा तपास केला जातोय.

एकाच कुटुबांतील चार लोकांची रातोरात हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण दक्षिण दिल्ली हादरलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने चाकू भोसकून चार जणांचा खून केला. त्याने ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली, याचा आता शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दिल्लीतील पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा व्यसनाच्या आहारी गेलेला होता, असा दाट संशय व्यक्त केला जातोय. तो नुकताच व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेऊन घरी परतला होता. पण घरी कुणाशीच त्याचं पटत नव्हतं.

घरात झालेल्या वादातूनच त्याने हे धक्कादायक कृत्य केलं असावं, अशी भीती व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे चार जणांचा जीव घेतल्यानंतर मारेकरी मुलगा कुठेही पळून गेला नाही. तो मृतदेहांशेजारीच बसून होता, अशीही माहिती समोर आलीय. आता अटक करण्यात आलेल्या या माथेफिरु मुलाची अधिक चौकशी पोलिसांकडून केली जातेय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.