‘हे’ तीन महिने गुन्ह्यांसाठी थंडss.. या महिन्यांमध्ये सगळ्यात कमी होतात चेन स्नॅचिंगच्या घटना; कारण काय ?
क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालावर विश्वास ठेवला, तर चोरीच्या बहुतांश घटना एप्रिल ते जून या काळात घडतात. त्याच वेळी, संपूर्ण वर्षातील सर्वात कमी चोरी ही नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात होते.
नवी दिल्ली | 17 नोव्हेंबर 2023 : आपल्या देशात असो किंवा बाहेरही, नवनवे दागिने घालणं आणि ते दाखवणं ( show-off हो!) याची प्रत्येक महिलेला आवड असते. आजकालचा जमानाच ‘झगामगा आणि मला बघा’ असा आहे. प्रत्येक गोष्टीचेचे प्रदर्शन केले जाते. मग नवे दागिने घेतले तर ते दाखवायला नकोत का ? असो, मस्करीचा भाग सोडला तर, या दागिन्यांवर फक्त आपली आणि आजूबाजूच्यांचीच नजर नसते तर चोरांचेही चांगलेच लक्ष असते. आणि याचाच फायदा घेऊन ते रस्त्यातून जाताना, संधी साधून चेन स्नॅचिंग करतात. गळ्यातलं, कानातलं, बांगड्या, सोने-चांदीची आभूषणं यांची चोरी होण्याचे बरेच प्रकार घडत असता.
क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालावर विश्वास ठेवला, तर चोरीच्या बहुतांश घटना एप्रिल ते जून या काळात घडतात. त्याच वेळी, संपूर्ण वर्षातील सर्वात कमी चोरी ही नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात होते. अशाप्रकारे रस्त्यातील चोरी, लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ आणि घट होण्यामागचे सर्वात मोठे कारण महिलांच्या आवडीत दडलेले आहे.
देशाची राजधानी दिल्लीतच, नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान दररोज सरासरी 21.6 टक्के चोरीच्या घटना घडल्या. त्याचप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च 2022 मध्ये सरासरी 24.9 टक्के घटनांची नोंद झाली. तर एप्रिल ते जून या कालावधीत 27.2 टक्के घटनांची संख्या वाढली. त्यानंतर जुलै 2022 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत पुन्हा एकदा चोरीच्या या घटनांमध्ये घट झाली आणि दररोज 25.2 टक्के घटनांची नोंद झाली. बर्याच प्रमाणात, 2021 आणि 2020 या वर्षात देखील असेच आकडे आहेत.
उन्हाळ्यात वाढते चोरी, पण थंडीत..
गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट होते की उन्हाळ्यात रस्त्यावरील चोरीच्या घटना वाढतात आणि हिवाळ्यात अशा घटना कमी होतात. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात स्त्रिया साधारणपणे कमी कपडे घालतात आणि जे काही दागिने घालतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. याचाच फायदा घेत चोरटे रस्त्यावर गुन्हे करून पळून जातात. पण थंडीच्या दिवसात महिला स्वेटरसोबतच जास्त कपडे घालतात. त्यामुळे त्यांचे दागिने एकतर झाकले जातात किंवा त्यांना सहज ओढून पळून जाणे कठीण होते.
थंडीत कमी मिळते संधी
हिवाळ्यात चोर एकदम शहाणे वगैरे होतात असं काही नाही. खरी गोष्ट अशी की थंडीत त्यांना असे गुन्हे करण्याची संधी कमी मिळते. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांत चोरीच्या घटना तुलनेने कमी असतात. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांवरी या गुन्ह्यासाठी तुलनेने कमी शिक्षा दिली जाते आणि गुन्हेगारांना लवकर जामीनही मिळतो. पण पीडितेबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्यासाठी ही छोटीशी घटना एखाद्या मोठ्या अपघातापेक्षा कमी नसते. वास्तविक, बहुतेक गुन्हेगार दुचाकीवरून येतात आणि चेन किंवा कानातले हिसकावून घेतात. पण त्या नादाता आपला गळा किंव ाकान कापाल जाऊन जखमी होऊ अशी भीती महिलाना वाटत असते.
तसेच चोरीच्या वेळेस समोरच्या व्यक्तीने विरोध दर्शवला तर हे चोर- दरोडेखोर जीवघेणा हल्लाही करतात. अशा परिस्थितीत स्नॅचिंगच्या घटनेचे रूपांतर दरोड्यात व्हायला वेळ लागत नाही.