छोट्याशा मुद्यावरून वाद पेटला, भडकलेल्या बायकोने नवऱ्याचा कानच चावला

| Updated on: Nov 27, 2023 | 2:56 PM

एक महिलेने रागाच्या भरात तिच्या नवऱ्याचा कान जोरात चावला. पोलिसांनी रविवारी याप्रकरणाची माहिती दिली. जोरात चावल्यामुळे उजव्या कानाचा वरचा भाग तुटला असून त्याची सर्जरी करावी लागल्याचे पीडित इसमाने सांगितले.

छोट्याशा मुद्यावरून वाद पेटला, भडकलेल्या बायकोने नवऱ्याचा कानच चावला
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नवी दिल्ली | 27 नोव्हेंबर 2023 : राजधानी दिल्लीतील सुल्तानपुरी भागातून एका अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. एक महिलेने रागाच्या भरात तिच्या नवऱ्याचा कान जोरात चावला. पोलिसांनी रविवारी याप्रकरणाची माहिती दिली. जोरात चावल्यामुळे उजव्या कानाचा वरचा भाग तुटला असून त्याची सर्जरी करावी लागल्याचे पीडित इसमाने सांगितले. पीडित व्यक्तीने उपचारांनंतर त्याच्या पत्नीविरोधात तक्राही दाखल केली आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, तक्रारीनंतर आरोपी महिलेविरुद्ध भादंवि 324 कलमाअंतर्गत महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

घराच्या स्वच्छतेवरून सुरू झाला वाद

पीडित इसमाने दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तो घराबाहेर केर टाकण्यासाठी गेला. तेव्हा त्याने पत्नीला घराची साफसफाई करण्यास सांगितले. मात्र तो घरात परत येताच , त्याच्या बायकोन विनाकारण त्याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. एवढंच नव्हे तर तू हे घर विक आणि मला माझा हिस्सा दे, म्हणजे मू मुलांसोब राहू शकेन, असी मागणीही तिने पतीकडे केली. मी तिला समजावायचा खूप प्रयत्न केला, पण वाद वाढतच गेला. हळूहळू तो एवढा विकोपाला गेला की बायकोने मला मारायचाही प्रयत्न केला म्हणून मी तिला जोरात दूर ढकललं, अस त्याने तक्रारीत नमूद केलं.

मी घराबाहेर पडतच होतो, तेवढ्यात बायकोने मला मागून पकडलं आणइ रागाच्या भरात तिने माझा उजवा कान एवढ्या जोरात चावला की माझ्या कानाचा वरचा भाग तुटला. त्यानंतर माझ्या मुलाने मला तातडीने उपचारांसाठी मंगोलपुरी येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यानंतर माझ्या कानाचे ऑपरेशन करण्यात आलं, असंही त्याने नमूद केले.

पोलिसांनी सुरू केला तपास

२० नोव्हेंबर रोजी घडलेल्या या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी एक पथक पाठवलं. मात्र पीडित इसम तेव्हा खूप अस्वस्थ होता आणि जबाबा देण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता. अखेर दोन दिवसांनी २२ नोव्हेंबर रोजी त्याने पोलिसांशी संपर्क साधून लेखी तक्रार नोंदवली. या प्रकरणी नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.