डर्टी गेमने दिल्ली हादरली… मुलगी बनून सोशल मीडियावर मुलींशी मैत्री, ‘ट्रूथ अँड डेअर गेम’च्या नावाखाली भयानक डिमांड; पायाखालची जमीनच…

टेक्नॉलॉजीचे फायदे आहेत तितकेच तोटेही. त्याने आयुष्यात उलथापालथ होऊ शकते. असंच काहीस दिल्लीतील एक अल्पवयीन मुलीसोबतही घडलं. सोशल मीडियावर मैत्री करणं तिला फार महागात पडलं.

डर्टी गेमने दिल्ली हादरली... मुलगी बनून सोशल मीडियावर मुलींशी मैत्री, 'ट्रूथ अँड डेअर गेम'च्या नावाखाली भयानक डिमांड; पायाखालची जमीनच...
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 1:52 PM

नवी दिल्ली | 1 मार्च 2024 : टेक्नॉलॉजीचे फायदे आहेत तितकेच तोटेही. त्याने आयुष्यात उलथापालथ होऊ शकते. असंच काहीस दिल्लीतील एक अल्पवयीन मुलीसोबतही घडलं. सोशल मीडियावर मैत्री करणं तिला फार महागात पडलं. राजधानी दिल्लीमधून ही हादरवणारी घटना समोर आली आहे.  सोशल मीडियावर मुलगी असल्याचे भासवत मुलीशी मैत्री करण्यात आली. तिचा विश्वास संपादन करून तिचे खासगी फोटो मिळवण्यात आले. आणि नंतर तेच फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलही करण्यात आलं. याप्रकरणी 27 वर्षांच्या आरोपीला उत्तराखंडमधून अटक करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

मुलीच्या नावाने उघडलं बनावट अकाऊंट

सुभान अली असे आरोपीचे नाव असून तो उत्तराखंडमधील उधमसिंहनगरच्या बाजपूर येथील रहिवासी असल्याचे समजते. त्याने सोशल मीडियावर मुलीच्या नावाने बनावट अकाऊंट उघडलं होतं. त्याचदरम्यान त्याची पीडित मुलीशी ओळख झाली . हळूहळू विश्वास संपादन करत त्याने तिच्याशी मैत्री केली आणि नंतर ‘ट्रूथ अँड डेअर गेम’च्या नावाखाली त्या मुलीला तिचे खासगी फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचे डेअर (आव्हान) दिले. त्यानंतर आरोपी सुभान याने त्या फोटोंचा गैरवापर करत पीडित (अल्पवयीन) मुलीला धमकी दिली.

असं उघड झालं प्रकरण

रिपोर्ट्सनुसार, पीडित मुलीच्या आईने तिच्या मोबाईलवर मुलीचे खासगी फोटो आणि व्हिडीओ पाहिले आणि मुलीला खडसावून चौकशी केली. त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपी सुभान हा आपल्या मुलीला त्रास देऊन, ब्लॅकमेल करत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केलं. मुलीचे खासगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून व्हायरल करेन, अशी धमकी त्याने दिल्याचेही पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं.

खरंतर पीडिता ही शाळेतील ऑनलाइन क्लाससाठी स्मार्टफोनचा वापर करायची. मात्र एके दिवशी तिच्या आईला याच फोनवर तिच्या मुलीचे खासगी फोटो आणि व्हिडीओ दिसले. तिने मुलीला खडसावलं आणि प्रश्न विचारले तेव्हा खरा प्रकार उघड झाला. आरोपी सुभान हा सोशल मीडियावर मुलगी असल्याचे भासवून बनावट अकाऊंट उघडायचा आणि मुलींना फसवून त्यांच्याशी चॅट करायचा असे तपासात उघड झाले.

उत्तराखंडमधून आरोपीला अटक

एके दिवशी (अल्पवयीन) पीडित मुलगी हिची आरोपीशी ओळख झाली आणि त्याच्या बोलण्याला भुलून (मुलगी समजून) पीडितेने तिचे खासगी फोटो त्याच्याशी शेअर केले. मात्र नंतर आरोपीने तिला त्याच फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल केले. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. सोशल मीडियावरील आयडी हा एका मोबाईल नंबरशी कनेक्टेड होता, जो उत्तराखंडच्या उधम सिंह नगर मध्ये सक्रिय दिसत होता. तपास सुरू असताना 24 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी छापा मारून आरोपीला अटक केली. तेव्हा त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याचा मोबाईलही जप्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.