मुलाने केलं असं कृत्य, जिवंतपणीच पित्याने भोगल्या मरणयातना…

काही वेळा मुलं असं काही वागतात, की त्यामुळे आई-वडिलांनाच धक्का बसतो, त्यांची मान अभिमानाने उंचावली जात नाही तर शरमेने खाली जाते. त्यांना जिवंतपणीच मरणयातना भोगाव्या लागतात. असाच काहीसा प्रकार राजधानी दिल्लीतही घडला आहे. तेथे कलियुगातील एका मुलाने असं कृत्य केलं ज्यामुळे त्याच्या वडिलांना जबर धक्का बसला.

मुलाने केलं असं कृत्य, जिवंतपणीच पित्याने भोगल्या मरणयातना...
क्राईम न्यूज
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 9:03 AM

मुलं ही प्रत्येक आई-वडिलांच्या आनंदाचा, अभिमानाचा केंद्रबिंदू असतो. मुलांसाठी अनेक स्वप्न आई-वडील पहात असतात. पण काही वेळा मुलं असं काही वागतात, की त्यामुळे आई-वडिलांनाच धक्का बसतो, त्यांची मान अभिमानाने उंचावली जात नाही तर शरमेने खाली जाते. त्यांना जिवंतपणीच मरणयातना भोगाव्या लागतात. असाच काहीसा प्रकार राजधानी दिल्लीतही घडला आहे. तेथे कलियुगातील एका मुलाने असं कृत्य केलं ज्यामुळे त्याच्या वडिलांना जबर धक्का बसला. तेथे एका मुलाने स्वत:च्याच वडिलांची हत्या करण्याचा , त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पित्याला एलबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर मुलाला अटक केली असून त्याचे नाव सचिन (वय 33) आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 नोव्हेंबर रोजी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली होती की मधु विहार परिसरात एका तरुणाने आपल्या वडिलांवर चाकूने हल्ला केला आहे. ही माहिती मिळताच उपनिरीक्षक शिवोम आणि कॉन्स्टेबल मनोज घटनास्थळी रवाना झाले. तेथे पोहोचताच घरात रक्ताचं थारोळं पसरल्याचं त्यांना दिसून आलं.

पोलिसांनी सुरू केला तपास

जखमी व्यक्तीला एलबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितलं. रुग्णालयात पोहोचल्यावर पीडित इसमाचे नाव वेदप्रकाश शर्मा ( वय 62) असल्याची माहिती मिळाली. त्यांच्यावर अतिशय धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीने सर्वांनाच धक्का बसला. शर्मा यांच्या मुलानेच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता, असे त्यांनी सांगितले. पीडिच इसमाच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपी मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली.

चौकशीत जे समोर आलं ते…

पोलिसानी कसून शोध घेतला आणि आरोपी मुलाला त्याच्या घराजवळूनच अटक केली. त्याने चौकशीत केलेल्या खुलाशाने एकच खळबळ माजली. आरोपी सचिनच्या सांगण्यानुसार, त्याचे वडिलांशी फारसे चांगले संबंध नव्हते. त्याच्या आईच्या मृत्यूनंतर तर त्यांचे संबंध आणखीनच बिघडले. 9 नोव्हेंबरच्या रात्री एका छोट्याशा कारणावरून पिता-पुत्रामध्ये वाद सुरू झाला. वडिलांवर नाराज असलेल्या मुलाने रागाच्या भरात जन्मदात्या पित्यावरच धारदार चाकूने वार केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून तो चाकूही जप्त केला आहे.

Non Stop LIVE Update
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?.
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.