Whatsapp वर फोटो दाखवून बुकींग, ऑर्डर मिळताच स्कूटीवरून…. मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश?
दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यात 22 महिला आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. या महिलांना झोमॅटो आणि स्विगीसारख्या अॅप्सच्या धर्तीवर ऑर्डर मिळाल्यावर स्कूटीवरून हॉटेल्स मध्ये पाठवण्यात येत होते.

एक अल्पवयीन मुलगा आणि 22 तरुणींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उज्बेकिस्तान आणि नेपाळसहीत भारतातील या तरुणी स्कूटीवर बेकायदेशीर काम करत होत्या. वेश्या व्यवसायात सहभागी असलेल्या या सर्व मुलींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या तरुणी दिवसभर घरात झोपायच्या आणि रात्री स्कूटीवरून काही तासांकडे ग्राहकांकडे पाठवल्या जायच्या. त्यांना स्कूटीवरून सोडलं जायचं. त्यासाठी त्या 700 रुपये ते 7000 रुपये घ्यायच्या. राजधानी दिल्लीत हा वेश्याव्यवसाय राजरोसपणे सुरू होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता या तरुणींना झोमॅटो आणि स्विगीच्या धरतीवर ऑर्डर मिळताच डिलिव्हरी बॉय स्कूटीवरून हॉटेलपर्यंत पोहोचवायचा. या नव्या कारनाम्याने पोलीसही चक्रावून गेले.
पोलीसही चक्रावून गेले
दिल्ली पोलिसांना या रॅकेटची माहिती मिळाली होती. पहाडगंजच्या काही हॉटेल आणि खोल्यांमध्ये काही तरुणींना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास मजबूर केलं जातं असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पहाडगंजमधील दोन हॉटेलांवर छापेमारी केली. येथील एका दुमजली इमारतीवरही पोलिसांनी रेड मारली. या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी एकूण 22 तरुणींना अटक केली. तसेच त्यांना हॉटेलपर्यंत सोडणाऱ्या एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी अटक केली आहे. यात एक उज्बेकिस्तानच्या मुलीचाही समावेश आहे.
नेपाळी मुलींची संख्याही तेवढीच
एका एनजीओने या धंद्याबाबत दिल्लीचे डीएसपी हर्षवर्धन यांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली. या रॅकेटचा मास्टरमाइंड निजाम आणि रेहान फरार आहे. हे दोघेही हे नेटवर्क चालवत होते. घराचं अॅग्रीमेंटही त्यांनीच केलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दोन हॉटेलातून पोलिसांनी एकूण सात मुलींना अटक केली आहे. तर चूना मंडी येथील एका इमारतीतून 16 मुलींना अटक केली आहे. या मुली नेपाळ, आसाम आणि पश्चिम बंगालमधून आणण्यात आल्या होत्या.
सात हजारापर्यंत रेट
या मुलींना पाच ते दहा मिनिटासाठी पाठवलं जायचं. त्यासाठी त्या 700 रुपयांपासून 10 हजार रुपये वसूल करायच्या. मुलींच्या आर्थिक मजबूरीचा फायदा उचलून त्यांना या धंद्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं. या मुलींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आता मास्टरमाइंडचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.