55 लाखांच्या सुपारीने तृतीयपंथीयाची हत्या, एकता जोशी हत्याकांडाचं गूढ सात महिन्यांनी उलगडलं
एकता जोशी ही किन्नरांच्या गुरुंची उत्तराधिकारी मानली जात होती. मात्र त्याची अधिकृत घोषणा होण्याआधीच तिची हत्या करण्यात आली (Delhi Transwoman Ekta Joshi Murder)
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील तृतीयपंथीयाची बहुचर्चित मर्डर केस सोडवण्यात पोलिसांना यश आलं आहे. वर्चस्ववादाच्या लढाईतून तृतीयपंथी एकता जोशीची हत्या करण्यात आली होती. यासाठी काँट्रॅक्ट किलर्सना तब्बल 55 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मारेकऱ्यांना अटक केली. (Delhi Transwoman Ekta Joshi Murder Case Kinnar killed over conflicts)
वर्चस्ववादातून सुपारी
दिल्लीत गेल्या वर्षी 5 सप्टेंबरला गोळी झाडून एकता जोशीची हत्या करण्यात आली होती. एकता जोशी ही किन्नरांच्या गुरुंची उत्तराधिकारी मानली जात होती. मात्र त्याची अधिकृत घोषणा होण्याआधीच तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी रविवारी दोघा सुपारी किलर्सना बेड्या ठोकल्या. तृतीयपंथीयांच्या एका गटाने दुसऱ्या गटाची वर्चस्ववादातून सुपारी केल्याचा खुलासा काँट्रॅक्ट किलर्सनी चौकशीत केला. सिमरन, कोमल आणि वर्षा या किन्नरांनी एकताची हत्या केल्याचा आरोप आहे.
दहा कोटींच्या बंगल्यात वास्तव्य
परिसरात वर्चस्व निर्माण करणं आणि पैशांचं कलेक्शन यातून निर्माण झालेल्या वादातून किन्नरांच्या एका गटाने दुसऱ्या गटाची नेता मानल्या जाणाऱ्या एकता जोशीची हत्या केली. एकता जोशी जीटीबी एन्क्लेव्हमध्ये जवळपास दहा कोटी रुपये किमत असलेल्या बंगल्यात राहत होती. या कोठीत तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यातील तृतीयपंथी राहत होते.
किन्नरांची गुरु अनिता जोशी सध्या या कोठीची मालकीण आहे. एकता जोशी काही दिवसात तिच्या स्थानी गुरु होणार होती. अनिताकडे यमुनापार भागातील किन्नरांच्या पैशांच्या कलेक्शनचा ठेका आहे. कुठल्या गल्लीत, कुठल्या भागात, किन्नरांचा कोणता गट जाणार, हे अनिता आणि एकता ठरवत असत.
एकता जोशीची गोळी झाडून हत्या
किन्नरांच्या कोठीबाहेर लक्झरी गाड्यांचा ताफा उभा असे. अनिता फॉर्च्युनर कार वापरत असे. तिच्या सुरक्षेसाठी सशस्त्र खासगी सुरक्षारक्षक होते. कोठीबाहेरील परिसराची सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून निगराणी ठेवली जात असे. इतर तृतीयपंथींसाठी लाल रंगाची क्रेटा कार होती. हत्येच्या दिवशी याच क्रेटा कारने (ज्याच्या मागे अनिता आणि एकता लिहिलं होतं) जीटीबी एन्क्लेव्हला गेल्या. त्यावेळी स्कूटीस्वार हल्लेखोरांनी एकतावर गोळी झाडली. हल्लेखोरांना आपल्यावरही गोळी झाडायची होती, मात्र एकताने मला वाचवलं, असं अनिताने सांगितलं.
संबंधित बातम्या :
अनैतिक संबंधातून सुटका करुन घेण्यासाठी मित्रानेच केली तृतीयपंथी युवकाची हत्या
गोरेगावातील तृतीयपंथीय हत्याकांडाचा अखेर उलगडा, चौघे अटकेत
(Delhi Transwoman Ekta Joshi Murder Case Kinnar killed over conflicts)