Washim NEET : हिजाब व बुरखा घातल्याने परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला!, नीट परीक्षेदरम्यान वाशिममध्ये घडला प्रकार, पालकांची पोलिसांत तक्रार
राज्यात काल 17 जुलै रोजी NEET चा पेपर घेण्यात आला. त्यात हजारो विद्यार्थ्यांनी पेपर दिला. मात्र वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय (Matoshree Shantabai Gote College) केंद्रावर बिजाब व बुरखा घातलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला.
वाशिम : राज्यात काल 17 जुलै रोजी NEET चा पेपर घेण्यात आला. त्यात हजारो विद्यार्थ्यांनी पेपर दिला. मात्र वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय (Matoshree Shantabai Gote College) केंद्रावर बिजाब व बुरखा घातलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला. चेहरा व हॉल टिकीट दाखविल्यानंतर त्यांना परीक्षा देऊ दिली नाही, असा आरोप मुलींच्या पालाकंनी केला आहे. या प्रकरणी वाशिम पोलिसांत तक्रार (Police Complaint) देण्यात आली आहे. मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात NEET चा पेपर घेण्यात आला. मात्र या विद्यार्थ्यांसह इरम मोहम्मद जाकीर व अरिबा समन गझनफर हुसैन यांच्या सोबत केंद्रातील प्रशासकीय अधिकारी व सदस्यांनी गैरवर्तन केले. बुरखा काढा नाही तर कात्रीने कापावं लागेल. एवढंच नव्हे तर भर रस्त्यात हिजाब व बुरखा काढायला लावला गेलं असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
वाशिमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणतात, नियमांचे पालन केले pic.twitter.com/b9nRyH28zQ
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) July 18, 2022
वाशिमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणतात, नियमांचे पालन केले
वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय केंद्रावर हिजाब व बुरखा घातलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला. असा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती. मात्र हे सर्व आरोपी कॉलेज प्राचार्य यांनी नाकारले आहेत. NEET नुसार गाईडलाईननुसार ही परीक्षा घेण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य जी. एस. कुबडे यांनी दिली.
शिक्षकांचे वर्तन अयोग्य असल्याचा आरोप
पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, आधी परीक्षा कक्षात येण्यास मज्जाव करण्यात आला. नंतर हिजाब आणि बुरखा काढून टाका, असे सांगून बाहेर पाठवण्यात आले. बराच वादावादी झाल्यानंतर शेवटी रस्त्यावर बुरखा आणि हिजाब काढण्यात आला. परीक्षा कक्षात ही उपस्थित शिक्षकांचे वर्तन योग्य नसल्याचेही पीडित विद्यार्थिनीने म्हटले आहे.
चौकशीनंतर कारवाई केली जाणार
या प्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी ठाणेदार रफीक शेख हे करत आहे. चौकशी अंती योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी यांनी दिली. पीडित विद्यार्थिनी अरिबा समन व वडील गझनफर हुसेन यांनी या प्रकरणी माहिती दिली. प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांनी सांगितलं.
विद्यार्थिनीने सांगितली आपबिती
नीटची परीक्षा होती. त्यासाठी वाशिमला सेंटर मिळाला होता. शांताबाई गोटे कॉलजचा सेंटर मिळाला होता. परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आम्हाला बाहेरूनच परत पाठविले. बुरखा, हिजाब उरतवून या, असं सांगण्यात आलं. एका तासापूर्वी हिजाब अलाऊ असल्याचं सांगितलं. पण, केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आमचं काही ऐकलं नाही. वाद घालून परीक्षा केंद्रावर जाऊ दिलं नाही. रस्त्यावर आम्हाला हिजाब आणि बुरखा उतरवाला लावला, असा आरोप विद्यार्थिनीने केलाय. परीक्षा केंद्रावर गेल्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांची वागणूक चांगली नव्हती, असा आरोप विद्यार्थिनीनं केलाय.