बंगळुरू/मंड्या: लक्झरी कार (Luxury Car) गाड्या या फिरण्यासाठी असतात. मात्र ती जर कोणत्यातरी नदीत तरंगताना दिसली तर अनेकांना धक्काच बसणार. तर कोणी म्हणेल की पाण्यावर धावणारी कारगाडी येणार होती ती आली वाटतं. पण ड्रायव्हरचा ताबा सुटला असावा आणि ती बुडाली असावी. हो असचं काहीस मंड्याच्या श्रीरंगपट्टणातील (Srirangapatna)कावेरी नदीच्या समोर आलेल्या घटनेवरून अनेककांना प्रश्न पडला आहे. कारण येथे चक्क एक आलिशान बीएमडब्ल्यू कार (BMW X6) कूप-शैलीतील कार नदीत पडलेली स्थानिकांना दिसून आलेली आहे. त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला. तसेच मोठा अपघात झाल्याची बातमी वाऱ्यागत परिसरात पसरली. यामुळे आजूबाजूचे लोक नेमके काय प्रकरण पाहण्यासाठी नदीकडे जाऊ लागले. दरम्यान याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. नदीतील चित्र पाहताच पोलिसही गोंधळात पडले. यानंतर अधिक तपास केल्यावर बेंगळुरूच्या रहिवाशानेच आपली कार नदीत फेकल्याचे समोर आले आहे. तर धक्कादायक म्हणजे त्याच्या आईच्या आकस्मिक निधनानंतर तो नैराश्यात (Depression)आला आणि त्यानेच आपली कार नदीत ढकल्याचे उघड झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कर्नाटकातील श्रीरंगपट्टणातील कावेरी नदीच्या मध्यभागी लाल रंगाची बीएमडब्ल्यू कार तरंगताना दिसत होती. त्यामुळे गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. तसेच अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. तसेच आपत्कालीन कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी कोणी त्या गाडीत होतं का याचा शोध घेण्यात आला. मात्र त्यांनी आत कोणी सापडले नाही.
तर आत कोणीही नसल्याचे लक्षात येताच गाडी नदीतून ओढण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी नोंदणी क्रमांक घेऊन तो वाहतूक विभागाला पाठवला आणि त्या गाडीचा मालकाचा शोध घेण्यात आला. वाहतूक विभागाला ही कार महालक्ष्मी लेआउट, बेंगळुरू येथे राहणाऱ्या रूपेश नामक व्यक्तीची असल्याचे कळाले. त्यानंतर त्यामाहितीच्या आधारे त्यांनी चौकशीसाठी श्रीरंगपटना येथे रूपेशला आणले. मात्र, तो माणूस उत्तर देण्याच्या स्थितीत नव्हता. पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला असता त्यांनी तो आईच्या मृत्यूनंतर डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगितले.
तर त्यादिवशी तो बंगळुरू येथील आपल्या घरी जाण्यापूर्वी खूप दुःखी झाला होता. आणि त्याने कार नदीत फेकून दिल्याचे कळाले. ती कार बीएमडब्ल्यू असून (BMW X6)ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.3 कोटी रुपये आहे. तर त्याच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवल्यानंतर त्याला सोडण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही. त्या व्यक्तीचे कुटुंबीय BMW कार घेऊन बंगळुरूला परत गेले.