विधवा वहिनी रात्री झोपली होती, तो आला अन्… दीर वहिनीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना!
विधवा महिला रात्री घरात झोपलेली होती. रात्रीचे 2 वाजले होते, मध्यरात्र झाली होती आणि त्यावेळी तिचा दीर घरी येतो. घरात कोणीच नव्हतं अन्...
Crime News : समाजात अनेक प्रेम प्रकरणांच्या घटना घडतात यामधीलच काही प्रेम प्रकरणांंमुळे गुन्ह्याचं प्रमाण वाढतं. महिलांवर अत्याचार करणाऱ्या घटनांमध्ये जे आरोपी असताता ते संबंधित पीडितेचे नातेवाईकांमधील किंवा ओळखीचेच असल्याचं समोर आलं आहे. मात्र काही नराधम त्यांच्याच घरातील महिलांकडे वाईट नजरेने पाहत असतात. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये दीराने आपल्या विधवा वहिनीसोबत चुकीचं कृत्य केलं आहे. त्यानंतर संबंधित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
ही घटना हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील आहे. विधवा महिला रात्री घरात झोपलेली होती. रात्रीचे 2 वाजले होते, मध्यरात्र झाली होती आणि त्यावेळी तिचा दीर घरी येतो. घरात कोणीच नव्हतं, याचाच तो फायदा घेतो. त्याच्याच वहिनीसोबत तो चुकीचं वर्तन करतो. वहिनीला जाग येते तेव्हा ती आरडाओरडा करते. जास्त गोंधळ झाल्यामुळे तिथून आरोपी दीराने पळ काढला. यानंतर दुसऱ्याच दिवशी ती पोलीस स्टेशनमध्ये जात दीराविरोधात स्टेशनमध्ये तक्रार दाखल करते.
तक्रार करताना, महिलेने याआधीही दीराने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला. मात्र बदनामीच्या भीतीने ती अजूनही शांत राहिली होती. पोलिसात जाऊन उगाच गवगवा होण्याचं तिने टाळलं मात्र तरीही नराधम काही सुधारला नाही. पोलीस आरोपी दीराला ताब्यात घेण्यासाठी घरी गेले तेव्हा त्याने तिथून पळ काढला होता. पतीचा मृत्यू झाल्यानंतर विधवा महिला घरगुती काम करते.
दरम्यान, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. मात्र, आरोपी दीर फरार असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.