धक्कादायक! ‘ते’ महिलांना महाराष्ट्र सीमेवरून कर्नाटकात नेत, प्रत्येकीसाठी 50 हजार रुपयांची फी, धाराशिव पोलिसांनी असा केला भांडाफोड

मुलगा मुलगी हा भेद करणे चुकीचे असुन गर्भलिंग तपासणी हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी असे प्रकार कुठे सुरु असल्यास त्याची गोपनीय माहिती आरोग्य व पोलीस विभागाला द्यावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय.

धक्कादायक! 'ते' महिलांना महाराष्ट्र सीमेवरून कर्नाटकात नेत, प्रत्येकीसाठी 50 हजार रुपयांची फी, धाराशिव पोलिसांनी असा केला भांडाफोड
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 1:28 PM

संतोष जाधव, धाराशिव : मुलगा असो वा मुलगी हा भेद आता कालबाह्य झाला आहे. दोघांनाही समान वागणूक, समान शिक्षण, समान अधिकारासाठी मोठी जनजागृती केली जातेय. मात्र अजूनही महिलांच्या पोटात वाढणारा गर्भ मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्यासाठी कोणतीही किंमत मोजणारे कमी नाहीत. याच दुष्प्रवृत्तीचा फायदा घेत कायद्याविरोधात जात अजूनही गर्भलिंग निदान करणारे रॅकेट महाराष्ट्रात सर्रास चालतायत. धाराशिव पोलिसांनी नुकताच अशा एका रॅकेटचा भांडाफोड केला. पोटातलं अपत्य मुलगा आहे की मुलगी हे तपासण्यासाठी या रॅकेटमधील लोक महिलांना महाराष्ट्रातून कर्नाटकात नेत असत, प्रत्येकीकडून 50 हजार रुपयांचे शुल्कही आकारले जात असत. पोलिसांनी नुकतंच याविरोधात सापळा रचून मोठी कारवाई केली.

असा रचला सापळा…

उमरगा हा भाग कर्नाटक सीमेजवळ असल्याने त्या भागात जाऊन गर्भलिंग तपासणी केली जाते, यापूर्वी सुद्धा असे प्रकार उघड होऊन गुन्हे नोंद केले आहेत तरी देखील हे रॅकेट चालूच आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सदर परिसरावर नजर ठेवली. खबरींनी सांगितल्या प्रमाणे एक दलाल गर्भवती महिलांना तपासणीसाठी कर्नाटक राज्यात घेऊन जात होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं. गर्भलिंग तपासणीसाठी हा दलाल प्रत्येक महिलेकडून 50 हजार रुपये घेत असे. मुलगा की मुलगी याचे निदान करीत होता.

यावेळीही कर्नाटक कनेक्शन

यापूर्वीदेखील उमरगा भागात अशा प्रकारचे रॅकेट उघडकीस आले होते. नुकत्याच पोलिसांनी केलेल्या कारवाईतदेखील अवैध गर्भलिंग तपासणीचे कर्नाटक कनेक्शन उघड झाले आहे. या रॅकेटमध्ये अजून किती जणांचा समावेश आहे, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. धाराशिव पोलिसांनी उमरगा येथे मोठी कारवाई करीत अवैध गर्भलिंग तपासणी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सापळा रचत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईनंतर आरोग्य विभाग तक्रार देत असुन गुन्हा नोंद करण्याची पुढील प्रक्रिया सुरु आहे.

उमरगा हा भाग कर्नाटक सीमेजवळ आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणे सोपे आहे. याचाच फायदा घेत त्या भागात जाऊन गर्भलिंग तपासणी केली जाते, यापूर्वी सुद्धा असे प्रकार उघड होऊन गुन्हे नोंद केले आहेत तरी देखील हे रॅकेट चालूच आहे.

मुलगा मुलगी हा भेद करणे चुकीचे असुन गर्भलिंग तपासणी हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे नागरिकांनी असे प्रकार कुठे सुरु असल्यास त्याची गोपनीय माहिती आरोग्य व पोलीस विभागाला द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.