Crime News : धारावी दाम्पत्यावरती चाकू हल्ला, पतीचा जागीचं मृत्यू, पत्नी गंभीर, मग…

| Updated on: Jan 18, 2023 | 7:44 AM

ही घटना धारावीच्या ९० फूट रोडवर घडली. धारावी पोलीस ठाणे घटनास्थळापासून अवघ्या काही अंतरावर असून हा संपूर्ण परिसर नेहमी गजबजलेला असतो. गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

Crime News : धारावी दाम्पत्यावरती चाकू हल्ला, पतीचा जागीचं मृत्यू, पत्नी गंभीर, मग...
dharavi police station
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील (Mumbai crime news) धारावी (Dharavi Area) परिसरात पती-पत्नी बाहेर निघालेले असताना एका व्यक्तीची चाकूने सपासप वार करुन पतीची हत्या करण्यात केली. पतीला वाचवताना पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच धारावी पोलिस (dharavi police station) घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत आरोपी तिथून फरार झाला होता. पोलिस तिथल्या परिसरातील सीसीटिव्ही तपासत असून लवकरचं या गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेऊ असं सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत जाहिद असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो सेक्युरिटी म्हणून काम करायचा, या प्रकरणी धारावी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत असून आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार केले आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

ही घटना धारावीच्या ९० फूट रोडवर घडली. धारावी पोलीस ठाणे घटनास्थळापासून अवघ्या काही अंतरावर असून हा संपूर्ण परिसर नेहमी गजबजलेला असतो. गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.