सहा वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचं गूढ काही तासात उकललं, बोरांच्या वाटणीवरुन मित्रानेच संपवलं

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सहा वर्षीय बालकाचा मृतदेह बुधवारी रात्री आढळला होता

सहा वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचं गूढ काही तासात उकललं, बोरांच्या वाटणीवरुन मित्रानेच संपवलं
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 7:48 AM

धुळे : सहा वर्षीय चिमुकल्याच्या हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात धुळे पोलिसांना अवघ्या काही तासात यश आलं आहे. बोरांच्या वाटणीवरुन झालेल्या भांडणाच्या रागातून चिमुकल्याची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. मयत मुलाच्या अल्पवयीन मित्रानेच दगडाने ठेचून त्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे. (Dhule Child Murder case solved minor friend killed over banter)

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नवी अंतुर्ली शिवारात सहा वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आला होता. बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली. चिमुरड्याची दगडाने ठेचून हत्या झाल्याचं समोर आल्याने धुळ्यात एकच खळबळ उडाली होती.

मजूर दाम्पत्याच्या चिमुकल्याची हत्या

चिमुकल्या मुलाची भरदुपारी हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. घटनेची माहिती मिळताच तालुका आणि जिल्ह्यातील तपास यंत्रणा रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल झाल्या. नवी अंतुर्ली भागात राहणाऱ्या मजूर दाम्पत्याचा तो मुलगा होता.

शेतात खेळताना चिमुकला गायब

मजुरीसाठी गेलेल्या आईसोबत चिमुकला गावातील एका शेतात गेला होता. दुपारी खेळत असताना अचानक तो गायब झाल्याचं त्यांच्या आईच्या लक्षात आलं. त्यानंतर लगेचच त्याची शोधाशोध सुरु झाली, मात्र काही तास उलटल्यानंतरही तो सापडला नव्हता. अखेर संध्याकाळी उशिरा एका शेतात तो मृतावस्थेत आढळून आला.

घटनास्थळी डीवायएसपी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय सोनवणे, पोहेकॉ गुलाब ठाकरे, पोलीस नाईक अनिल शिरसाट, ललित पाटील, दिनेश माळी, रवींद्र ईशी, सनी सरदार, बापूजी पाटील, अमित जाधव, उमेश पाटील, स्वप्नील बांगर यांनी पाहणी केली. (Dhule Child Murder case solved minor friend killed over banter)

घटनेचं गांभीर्य पाहता घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, श्वान पथक, सायबर क्राईम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आदींचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित राहिले. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

चोरीच्या तपासात पोलिसांनी लावला खुनाचा छडा; मुंबई पोलिसांची कामगिरी

रक्ताच्या थारोळ्यातील तरुणीच्या कुटुंबीयांना तीन शब्दांवरुन शोधलं, कल्याण पोलिसांची कमाल

(Dhule Child Murder case solved minor friend killed over banter)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.