VIDEO | मुंबई-आग्रा महामार्गावर मद्यधुंद दीर-भावजयीचा धिंगाणा, महिलेची पोलिसांना धक्काबुक्की

40 वर्षीय महिला आणि तिचा दीर रस्त्यावर गोंधळ घालत होते, त्यावेळी आलेल्या पोलिसांनाच महिलेने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली (Dhule Drunk lady Mumbai Agra Highway)

VIDEO | मुंबई-आग्रा महामार्गावर मद्यधुंद दीर-भावजयीचा धिंगाणा, महिलेची पोलिसांना धक्काबुक्की
मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्याजवळ मद्यधुंद महिलेचा धिंगाणा
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 9:36 AM

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्यात महिला आणि पुरुषाने दारु पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे चौकशीसाठी आलेल्या पोलिसाचीच कॉलर पकडून महिलेने त्यांना धक्काबुक्की केली. संबंधित महिला आणि पुरुष दीर-भावजय असल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. (Dhule Drunk lady creates ruckus at Mumbai Agra Highway with brother in law)

पोलिसांना धक्काबुक्की करुन अर्वाच्च शिवीगाळ

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा टोलनाक्याजवळ हा प्रकार घडला. भररस्त्यात दारु पिऊन संबंधित महिलेने धिंगाणा घातला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याची विचारपूस करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी विचारपूस सुरु केली असता महिलेने पोलिसाची कॉलर पकडली. त्यांना धक्काबुक्की करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. हा प्रकार तिथे उभे असलेला पोलीस कर्मचारी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता.

40 वर्षीय महिलेसह दीराचीही हुज्जत

धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील जुन्या टोलनाक्यापासून जवळच हॉटेल शीतलपासून पुढे असलेल्या महामार्गालगत हा प्रकार घडला. 40 वर्षीय महिला आणि तिचा दीर रस्त्यावर गोंधळ घालत होते गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक आणि काही कर्मचारी त्या ठिकाणी आले. त्या पुरुषाला विचारणा करत असताना महिलेने उलट पोलिसांनाच शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

दारुच्या बाटल्या ताब्यात, दीर-भावजयीवर गुन्हा

यावेळी घटनास्थळी पोलिसांनी दारुच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. संबंधित महिला आणि पुरुषाने म्हणजेच तिच्या दीराने मद्यप्राशन केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

कोण म्हणतो पुरूषच जास्त पेताड, आता महिलाही डबल टल्ली! वाचा सविस्तर

दूध आणायच्या वेळेत अनेक पुणेकर दारु दुकानांच्या रांगेत, महिलाही वाईनसाठी लाईनमध्ये

(Dhule Drunk lady creates ruckus at Mumbai Agra Highway with brother in law)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.