शेतातला बनावट दारुचा कारखाना उधळला, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त, धुळे पोलिसांची दणकेबाज कामगिरी

धुळे पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली आहे पोलिसांनी. शिरपूर तालुक्यात एका शेतामधील बनावट दारुचा कारखाना उधळला आहे.

शेतातला बनावट दारुचा कारखाना उधळला, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त, धुळे पोलिसांची दणकेबाज कामगिरी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 4:18 PM

धुळे : धुळे पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली आहे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील हिलरखेडा शिवारातील एका शेतात असणाऱ्या घरात अवैध दारुचा कारखाना होता. या बनावट दारुच्या कारख्यान्याबाबतची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश शिरसाठ यांना एका गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. याच माहितीच्या आधारावर त्यांनी एक पथक बनवत संबंधित शेतात छापात टाकून दारुचा कारखाना उधळला. यावेळी पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच बनावट दारुसाठी लागणारा 19 लाख 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?

सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश शिरसाठ यांना बनावट दारुच्या कारखान्याची माहिती मिळाली होती. याबाबत शिरसाठ यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर कारवाईसाठी एक पथक तयार करण्यात आलं. या पथकाने हिवरखेडा येथे शेतात जाऊन छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 19 लाख 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चार आरोपींना बेड्या ठोकल्या. चारही आरोपी हे मुळचे मध्यप्रदेशातील आहेत. राजेश गिलगार बर्डे ( वय 23), कैलासचंद्र पुरभिया (23), देवेंद्र मोतीलाल मालवी (वय 19), योगेश बाबुराव मालवी (22) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी कारखान्यातून बनावट दारु बनविण्याकामी लागणारे साहित्य जप्त केलं आहे. यामध्ये स्पिरीट रसायनचे 10 ड्रम, 30 हजार रिकाम्या बाटल्या, 1 लाख 20 हजार दारूच्या बाटल्याचे बनावट बुच, बॉटलला बुच लावण्याचे मशीन , बॉम्बे व्हिस्की, गोवा व्हिस्की कंपनीचे बनावट लेबल, 2 होलोग्राम बंडल त्यात एक लाख लग, इलेक्ट्रिक मोटार असा एकूण 19 लाख 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांच्या ‘या’ पथकाने कारवाई केली

संबंधित कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई नरेंद्र खैरनार, असई महेंद्र वानखेडे, असई नियाज शेख, पोकॉ हेमंत पाटील, राजेंद्र मांडगे, धनगर, हेमंत पाटील, संजीव जाधव, पवन गवळी, पोना. कुंदन पवार, पोकॉ. इसरार फारूकी, मपोकॉ. सुनिता पवार आणि मपोना. अश्विनी चौधरी यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास सपोनि सुरेश शिरसाठ स्वतः करीत आहेत.

हेही वाचा : गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या मुलाला कानाखाली मारल्याचा राग, पुण्यात तरुणाची हत्या

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.