पोलीस अधीक्षकांच्या घराजवळच दरोडा, चोरट्यांचं थेट धुळे पोलिसांना आव्हान
धुळे शहरामध्ये चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे (Robbery Near Dhule Superintendent Of Police House).
धुळे : धुळे शहरामध्ये चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे (Robbery Near Dhule Superintendent Of Police House). पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात झालेल्या चोऱ्यांनंतर आता पोलीस अधीक्षकांच्या घराजवळ चोरीची घटना घडली आहे. धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या निवासस्थानाच्या जवळच असलेल्या एका घरामध्ये चोरट्यांनी हात साफ केला आहे (Robbery Near Dhule Superintendent Of Police House).
धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांचे निवासस्थान असलेल्या गोपाळ नगर रोड जिमखाना याठिकाणी धाकड वृद्ध दाम्पत्य राहतं. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खराब असल्यामुळे हे वृद्ध दाम्पत्य धुळे शहरातील आपल्या मुलाच्या घरी राहण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होतं. ते बघून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरामध्ये असलेले चाळीस हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. तसेच, चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकले.
पोलीस अधीक्षकांच्या घराजवळच चोरट्यांनी चोरी करुन चोरट्यांनी धुळे पोलिसांनाच आव्हान दिलं असल्याचं या चोरीतून निदर्शनास येत आहे. आता तरी धुळे पोलीस चोरट्यांचा बंदोबस्त करणार का याकडे संपूर्ण धुळेकरांच लक्ष लागून राहिल आहे.
150 एटीएममध्ये क्लोनिंग, हजारो ग्राहकांना लुटणाऱ्या आठ जणांच्या टोळीची अखेर मुंबई पोलिसांशी गाठhttps://t.co/xaKSze14Vg#ATM #Fraud @MumbaiPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
Robbery Near Dhule Superintendent Of Police House
संबंधित बातम्या :
काँग्रेसच्या महिला पदाधिकारीने लुबाडलं, शिवसेनेच्या महिला आघाडीनं चोपलं, कल्याणमध्ये तुफान राडा
गाडीच्या काचेवर टकटक करणारी ‘गँग’, मुंबईत मोबाईल, लॅपटॉपसह मौल्यवान वस्तू चोरणारे गजाआड