दिल है हिंदुस्तानी और बीवी पाकिस्तानी; वर्ल्ड कपमध्ये दोघांचीही लढाई, या संघर्षातही यांच्या प्रेमाची गोष्टच भारीय…
भारत-पाकिस्तानचा सामना असेल त्यावेळी देशप्रेम उफाळून येतं, मात्र दोघं पती भारतातील आणि पत्नी पाकिस्तानातील असेल त्यावेली त्यांची परिस्थिती काय होईल...
नवी दिल्लीः भारत-पाकिस्तान (India Pakistan) यांच्यातील क्रिकेटचा (Cricket) सामना जेव्हा जेव्हा होत असतो तेव्हा तेव्हा दोन्ही देशातील चाहत्यांच्या भावना प्रचंड देशप्रेमांनं उफाळून येत असतात. पण जेव्हा घरात नवरा भारतीय आणि पत्नी पाकिस्तान संघाचं समर्थन करत असेल त्यावेळची परिस्थित काय असेल. हा फक्त विचार केलेलाच बरा नाही का?
अली इकबाल आणि कुरअत-उल-ॲन (Iqbal and Qur’at-ul-An) यांच्या क्रिकेट प्रेमाची गोष्ट मात्र न्यारीच आहे. ही दोघं पती पत्नी असली तरी नवरा हा भारतीय आहे तर ॲन ही पाकिस्तानातील आहे.
म्हणून भारत पाकिस्तान क्रिकेट सामना असला की मात्र स्टेडियमवर जेवढा ताणतणाव नसतो तेवढा ताणतणाव यांच्या घरात असल्याचं ही दोघं सांगतात. पण ते प्रेमानं.
अली इकबाल जेव्हा जेव्हा घरच्या मैदानावर भारत-पाकिस्तान सामना पाहत असतो आणि भारतीय फलंदाज चौकार-षटकार मारत असतात तेव्हा मात्र घरात तणाव पसरतो.
आणि हा तणाव काय आताचा आहे असं नाही तर अली आणि पत्नी कुरअत-उल-ॲनच्या या दोघांच्या पहिल्या भेटीपासून ताणतणावचं वातावरण आहे.
नवऱ्याची वरात ज्यावेळी पाकिस्तानात गेली होती, त्यावेळीही हा प्रेमाचा संघर्ष सुरुच होता असंही ती सांगते. आणि जर भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका असेल तेव्हा हा संघर्ष आणखी वाढत असतो असंही ते सांगतात.
हे कुटुंब आता जवळपास एक दहा वर्षापासून ऑस्ट्रेलियात राहते आहे. मात्र सुमारे 20 वर्षांपूर्वी पासून त्यांना भारत आणि पाकिस्तानमध्ये येणं जाणं अवघड होते.
भारत आणि पाकिस्तानची ज्यावेळी फाळणी झाली होती, त्यावेळी ही दोन्ही कुटुंबं भारत आणि पाकिस्तानात विभागली गेली. मात्र त्यानंतर या दोन्हीही कुटुंबीयांनी कौटुंबीक नातं जपत येणं-जाणं सुरु ठेवलं होतं.
ॲन ही आठवीच्या वर्गात असताना ती पहिल्यांदा लखनऊला गेली होती. त्यावेळची ती आठवण सांगताना म्हणते की, तिथे का गेले होते, माहिती नाही मात्र गेले नसते तर मात्र या सगळ्यांपासून मी वाचले असते असंही ती सांगते.
ही दोघं 1980 च्या काळातील या दोघांच्या आयुष्यातील गोष्टी सांगतात, त्यावेळी ही म्हणतात, आजच्यासारखा त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, मात्र आम्ही दोघं एकमेकांना पत्र लिहित होतो. आणि त्यातूनच आम्ही एकमेकांशी बोलत होतो.
ॲन सांगते की, एका एका पत्राची दोन महिने वाट पाहिल्यानंतर ते पत्र येत होतं, मात्र ते पत्र आले की, आधी आई वडिल वाचत आणि नंतर ॲनच्या हातात ते पत्र मिळायचे.
ॲन यांचे आई वडिल त्याचे पत्र वाचतात हे जेव्हा त्याला समजले तेव्हा मात्र पत्रातून फक्त ख्याली खुशालीच विचारत होतो असं ते सांगतात.
त्यानंतर काही दिवसांनी इंटरनेटची सोय झाली आणि या दोघांचे मेसेंजरमधून बोलणे सुरु झाले. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांच्या संमतीने लग्न झाले.
लग्नाची गोष्ट सांगताना ॲन म्हणते की, त्यावेळी माझी आई म्हणायची तुझं लग्न भारतातच नाही तर कुठंही होऊ शकेल. कारण त्यावेळी साधनं कमी होती, आणि येण्या जाण्याच्या अडचणीही होत्या.
त्यावेळी भारत-पाकिस्तानमधील विमानेही दुबईतून जात असत. त्यामुळे फ्लाइटसोबतच लग्न सांभाळतानाही व्हिसाच्या अडचणी येत होत्या.
भारत पाकिस्तान संबंधाविषयी सांगताना दोघंही 2004 मधील आठवण सांगतात त्या म्हणतात, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध मवाळ होऊ लागले होते. तेव्हा दोन्ही देशांदरम्यान एकदिवसीय आणि कसोटी मालिका जाहीर करण्यात आली होती.
त्यावेळी त्याला ‘फ्रेंडशिप सीरिज असं नाव देण्यात आले. आणि त्याचवेळी अली आणि त्यांचे कुटुंबीय पाकिस्तानात येण्याची आशा वाढली होती.
त्यावेळी करामध्ये एकदिवसीय सामन्यासाठी पाकिस्तानला येण्यासाठी 14 दिवसांचा व्हिसा मिळाला होता. त्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि मित्रही कराचीला आले.
त्यावेळी त्या क्रिकेट सामन्याचा आम्ही खूप आनंद घेतला, आणि त्यावेळीही भारतानेच मॅच जिंकली होती असंही अली आनंदाने सांगत असतो. आणि त्यावेळच्या प्रसंगावर मात्र ॲन म्हणते त्या मॅचच्या वेळी मला प्रचंड वाईट वाटले, आणि खरं तर त्यावेळेपासूनच माझं दुर्दैव सुरु झालं असंही त्या सांगतात.
ज्या ज्या वेळी भारत आणि पाकिस्तान असा सामना असतो त्या त्यावेळी घरामध्ये सगळ्या भावना उफाळून आलेल्या असतात. म्हणजे सामना सुरु असताना हा समोरचा दुश्मनच वाटू लागतो असंही ॲन सांगतात.
त्यांचा आनंद बघून वाईट वाटतं, तर इतर वेळी मात्र हे आनंदीच असावे अशी भावना असते. मात्र सामना सुरु असताना त्यांचा आनंद म्हणजे आत कुठेतरी मन जळत असतं असंही ॲन सांगते.
अली यांना क्रिकेटचा बालपणापासून आवड आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान हीच मॅच पाहिजे असं नाही मात्र कोणतीही मॅच असली तरी ते आनंदाने बघायला जातात असंही ॲन सांगतात.
भारत पाकिस्तान हा सामना पाहताना घरातील माहोल बिघडू नये म्हणून सगळेच जण प्रयत्नशील असतात असंही ते सांगतात.
भारत पाकिस्तानच्या सामन्यावेळची अॅन गोष्ट सांगते ती वेगळी आहे, ती म्हणते की, खरं हे असतं की, भारत जिंकल्यानंतर मला आतून खूप वाईट वाटत असते, आणि त्यामुळे कोणीतरी आनंदी आहे यामुळे मला खूप वाईट वाटते असंही ती सांगते. दरवेळी भारत जिंकतो हे मी सहजा सहजी सहनही नाही करु शकत.
ॲन म्हणते की, जर माझे वडिल मॅच पाहण्यासाठी पाकिस्तानातू आले असतील तर मात्र आमच्या येथे स्टेडियमवर जेवढा तणाव नसतो तेवढा तणाव आमच्या घरात जाणवत असतो असंही ती सांगते.