Javed Akhtar : गीतकार जावेद अख्तर यांना मोठा दिलासा, अंधेरी कोर्टाच्या आदेशाला दिंडोशी सत्र न्यायालयाकडून स्थगिती, प्रकरण काय?

अभिनेत्री कंगना रनौत आणि जावेद अख्तर यांच्यात सध्या कोर्टात वाद सुरु आहे. कंगना रनौत हिच्या तक्रारीवरुन अंधेरी कोर्टाने दिलेल्या आदेशाविरोधात जावेद अख्तर यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Javed Akhtar : गीतकार जावेद अख्तर यांना मोठा दिलासा, अंधेरी कोर्टाच्या आदेशाला दिंडोशी सत्र न्यायालयाकडून स्थगिती, प्रकरण काय?
गीतकार जावेद अख्तर यांना दिलासाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 6:36 PM

मुंबई / 24 ऑगस्ट 2023 : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने दाखल केलेल्या याचिका प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने गीतकार जावेद अख्तर यांना मोठा दिलासा आहे. अंधेरी कोर्टाने दिलेल्या आदेशाला दिंडोशी सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने जावे अख्तर यांच्याविरोधात समन्स जारी करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र जावेद अख्तर यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेत पुनर्निरीक्षण याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आझ सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अंधेरी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देत जावेद अख्तर यांना दिलासा दिला, अशी माहिती अखतर यांचे वकील अॅड. जय भारद्वाज यांनी दिली.

काय आहे प्रकरण ?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कंगना हिने अख्तर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यानंतर, अख्तर यांनी कंगनाविरोधात बदनामी प्रकरणी फौजदारी तक्रार नोंदवली होती. कंगनानेही अख्तर यांच्याविरोधात धमकावणे आणि अपमान केल्याची तक्रार नोंदवली होती. कंगना हिने केलेल्या या तक्रार प्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी अख्तर यांच्याविरोधात सोमवारी फौजदारी कारवाई सुरू केली होती. तसेच अख्तर यांना समन्स बजावून 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते .

कंगनाच्या तक्रारीनुसार, अभिनेता हृतिक रोशन याच्याशी झालेल्या वादाप्रकरणी अख्तर यांनी हृतिकची माफी मागण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. त्यांचे म्हणणे मान्य करण्यास नकार दिल्यावर अख्तर यांनी आपल्याला धमकावले आणि आपला अपमान केल्याचा दावाही कंगनाने केला होता. याप्रकरणी अख्तर यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण याचिका दाखल केली होती. याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने अंधेरी कोर्टाने दिलेल्या आदेशावर स्थगिती दिली आहे. जावेद अख्तर यांना मोठा दिलासा मानला जातोय.

हे सुद्धा वाचा